गुवाहाटी : भारताने अॅथलेटिक्स, नेमबाजी आणि टेनिसमध्ये ‘गोल्डन स्वीप’ करताना दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. भारताने यासह सॅग स्पर्धेत एक हजार सुवर्णपदकांचा आकडा पार केला. भारताने १२व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये गुरुवारी सर्व, ७ सुवर्णपदके जिंकली. भारताने याव्यतिरिक्त नेमबाजीमध्ये ५ सुवर्ण, तर टेनिसमध्ये सर्व, ५ सुवर्ण व ५ रौप्य पदके पटकावण्याची कामगिरी केली. भारताने या स्पर्धेत १३६ सुवर्ण, ७७ रौप्य आणि २० कांस्य पदकांसह एकूण २३३ पदके पटकावली आहेत. भारताने २००६मध्ये कोलंबो येथे झालेल्या स्पर्धेत ११८ सुवर्ण, ५९ रौप्य आणि ३७ कांस्य पदके पटकावली होती. भारताने आज हा विक्रम मोडला. भारताची घोडदौड सुरूआजपासून सुरू झालेल्या महिला कबड्डीमध्ये भारताने नेपाळचा ५१-१६ गुणांनी धुव्वा उडवून आपली विजयी घोडदौड सुरू केली़ भारताच्या विजयात अभिलाषा म्हात्रे, स्रेहल शिंदे, तेजस्वीनी यांनी चांगला खेळ केला़.
टेनिसमध्ये दबदबा.भारतीय टेनिसपटूंनी आपले वर्चस्व सिद्ध करताना आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. भारतीय खेळाडूंनी बुधवारी स्पर्धेत ३ सुवर्णपदकांवर नाव कोरले होते.
भारत-नेपाळची बरोबरीतमहिलांच्या फुटबॉल स्पर्धेत भारत आणि नेपाळच्या महिला संघांत झालेली लढत ०-० अशी बरोबरीत सुटली. मात्र, तरीही नेपाळ संघ सलग दुसऱ्यांदा स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला.