jyothi yarraji world athletics : भारताची धावपटू ज्योती याराजीने इतिहास रचला आहे. तिने आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. बॅंकॉकमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत ज्योतीने महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ही किमया साधली.
२३ वर्षीय धावपटूने अवघ्या १३.०९ सेकंदात १०० मीटर अंतर गाठून सोनेरी कामगिरी केली. तिच्या पाठोपाठ (१३.१३ सेकंद) जपानची धावपटू तेरडा असुका आणि ओकी मासुमी (१३.२६ सेकंद) होती. दरम्यान, महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताने हे पहिलेच सुवर्ण पदक जिंकले आहे.