शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

भारताचे आघाडीचे खेळाडू राबत आहेत शेतामध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 4:13 AM

लॉकडाऊनमध्ये शेतकाम थांबू नये यासाठी पॅरालिम्पिक अ‍ॅथलिट रिंकू हुड्डा, स्टार बॉक्सर अमित पंघाल आणि मनोज कुमार तसेच हॉकीपटू पूनम मलिक लॉकडाउनमध्ये शेतकाम करीत आहेत.

मुंबई : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग थांबले असताना क्रीडाविश्वालाही ब्रेक लागला आहे. सर्वच क्षेत्रांतील व्यवहार थांबले असले, तरी कृषी क्षेत्र मात्र सुरू आहे. परंतु, यामध्येही शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकांना पीक कापणीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने आता शेतकरी कुटुंबातील खेळाडूंनीच शेतात उडी घेतल्याचे पाहण्यास मिळत आहे. लॉकडाऊनमध्ये शेतकाम थांबू नये यासाठी पॅरालिम्पिक अ‍ॅथलिट रिंकू हुड्डा, स्टार बॉक्सर अमित पंघाल आणि मनोज कुमार तसेच हॉकीपटू पूनम मलिक लॉकडाउनमध्ये शेतकाम करीत आहेत.रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता रिंकू हुड्डाने म्हटले की, ‘मशीनच्या मदतीने गहू पिकाची कापणी करण्याचे माझे काम आहे. ९ एकरच्या गहू पिकाची कापणी मशीनद्वारे पूर्ण झाली आहे. आता अर्धा एकरची कापणी शिल्लक आहे. आशा आहे की पावसाच्या आधी गव्हाच्या पॅकिंगचेही काम पूर्ण होईल.’ अनेक आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धांत भारताच्या पदकांचे स्वप्न पूर्ण केलेल्या अमित पंघालने म्हटले की, ‘मी शेतकरी पुत्र असून शेतकामातून मला समाधान मिळत आहे.’ अमित सध्या रोहतक येथील आपल्या मान्या या गावी आहे. लॉकडाउनदरम्यान तो आपल्या घरच्यांना शेतकामामध्ये मदत करीत आहे. अमितने सांगितले की, ‘मी नेहमीच माझ्या परिवाराची न सांगताच मदत करीत असतो. बॉक्सिंगमुळे मला दरवेळी गहू कापणीच्या वेळी गावाबाहेर राहावे लागले आहे. मात्र आता लॉकडाउनमुळे मी माझ्या गावी असून परिवारासोबत गहू कापणी आणि पॅकिंग करीत आहे. शेतकरी पुत्र असल्याने मला या कामामध्ये समाधान मिळत आहे.’२०० आंतरराष्ट्रीय हॉकी सामने खेळलेली पूनम मलिकही लॉकडाउनमुळे आपल्या गावी उमरा येथे आहे. तीदेखील शेतकामामध्ये व्यस्त आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला तिने सांगितले की, ‘लॉकडाउनमुळे सर्वच खेळ थांबले आहेत. लॉकडाउनमुळे गहू कापणीसाठी मजूरही उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे परिवारासह शेतात जाऊन मी कापणीचे काम करीत आहे.’ विशेष म्हणजे पूनमने पहिल्यांदाच कापणीच्या कामाचा अनुभव घेतला आहे. (वृत्तसंस्था)>मनोजही करतो कापणीदोनवेळा आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेला बॉक्सर मनोज कुमारही सध्या आपल्या शेतात राबत आहे. १९९९ सालानंतर केवळ दुसऱ्यांदाच तो गहू कापणीच्या वेळी आपल्या गावी (राजौद) उपस्थित आहे. लहानपणी त्याने अनेकदा गहू पिकाची कापणी केली आहे. मात्र यंदा लॉकडाउनमुळे तो आपल्या परिवाराला शेतकामामध्ये मदत करीत आहे. ‘मजूर मिळत नसल्याने, खºया अर्थाने मी शेतकरी म्हणून काम करीत आहे,’ असे मनोजने सांगितले.