फातुल्ला : साखळी फेरीत वर्चस्व गाजविणाऱ्या भारतीय संघाला शनिवारी नामिबियाविरुद्ध १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात ‘दोन हात’ करायचे आहेत. उपांत्य लढतीच्या दृष्टीने भारतीय खेळाडूंना सराव करण्याची ही संधी असेल.ड गटात भारताने आयर्लंड, न्यूझीलंड व नेपाळला नमवून अव्वल स्थान पटकविले. दुसरीकडे द. आफ्रिकेला लोळवणाऱ्या नामिबियाला भारत सहज घेणार नाही. नामिबियाने स्कॉटलंडचाही पराभव केला होता पण साखळीतील अखेरच्या लढतीत बांगलादेशकडून त्यांना पराभवाची चव चाखावी लागल्याने अ गटात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
भारताचे संघाचे ‘मिशन सेमीफायनल’!
By admin | Published: February 06, 2016 3:16 AM