शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
2
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
3
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
4
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
5
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
6
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
7
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
8
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
9
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
10
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
11
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?
12
श्रेयस अय्यर आणि त्याच्या आईची मुंबईत नवीन खरेदी; अपार्टमेंटची किंमत ऐकून बसेल धक्का
13
१० व्या मिनिटाला आयफोन १६! टाटांनी डाव टाकला; फ्लिपकार्टची तंतरली, थेट फॅक्टरीतून? 
14
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
15
ही आहेत चार प्रभावशाली कुटुंब, ज्यांच्याकडे आहे तिरुपतीच्या पूजेची जबाबदारी, एवढं मिळतं मानधन, आहे कोट्यवधीची संपत्ती
16
Telegram सीईओ Pavel Durov दबावाला बळी पडले? IP Address, नंबर शेअर करणार!
17
तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त
18
“विरोधकांनी राजकारण करायची गरज नाही”; अक्षय शिंदे एन्काउंटरवर रामदास आठवले थेट बोलले
19
धक्कादायक! ॲमेझॉन जंगलात अंदाधुंद वृक्षतोड; दोन देशांच्या क्षेत्रफळाइतके जंगल साफ...
20
Akshay Kumar : "आवाज केला असता तर गोळ्या घातल्या असत्या"; अक्षय कुमारने सांगितला चंबळचा थरारक अनुभव

आवेश-लोमरोर यांच्या कामगिरीने भारत उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Published: January 31, 2016 3:09 AM

सर्फराज खान (७४) याचे आणखी एक शानदार अर्धशतक आणि आवेश खान (३२ धावांत ४ बळी) आणि महिपाल लोमरोर (४७ धावांत ५ बळी) यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर

मिरपूर : सर्फराज खान (७४) याचे आणखी एक शानदार अर्धशतक आणि आवेश खान (३२ धावांत ४ बळी) आणि महिपाल लोमरोर (४७ धावांत ५ बळी) यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने न्यूझीलंडचा शनिवारी एकतर्फी लढतीत १२० धावांनी धुव्वा उडवत आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेच्या ‘ड’ गटातून उपांत्यपूर्व फेरी गाठली.भारताने ८ बाद २५८ अशी मजबूत धावसंख्या उभारल्यानंतर न्यूझीलंडला ३१.३ षटकांतच १३८ धावांत गुंडाळले. आवेश खानने न्यूझीलंडच्या आघाडीच्या चार फलंदाजांना तंबूत धाडले, तर लोमरोर याने मधल्या आणि तळातील फलंदाजीचा क्रम उद्ध्वस्त केला.१0 षटकांत ३२ धावांत ४ गडी बाद करणारा मध्य प्रदेशचा मध्यमगती गोलंदाज आवेश सामनावीर ठरला. डावखुरा फिरकी गोलंदाज लोमरोरने त्याची सर्वोत्तम कामगिरी करीत ७.३ षटकांत ४७ धावा देत ५ गडी बाद केले. जिशान अन्सारीने १९ धावांत १ गडी बाद केला. भारताचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. दोन्ही संघांत आता १ फेब्रुवारी रोजी गटातील अखेरचा सामना होणार आहे. त्यावर गटातील अव्वल संघ ठरणार आहे.आवेशच्या भेदक गोलंदाजीने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडने ११ व्या षटकापर्यंत ४ फलंदाज १६ धावांत गमावले होते. न्यूझीलंडच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडी धावसंख्यासुद्धा गाठता आली नाही. न्यूझीलंडचे ८ फलंदाज ८८ धावांत तंबूत परतले; परंतु पारीख आणि स्कॉटने त्यांच्या संघाला १३८ पर्यंत पोहोचवले. त्याआधी भारताची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी त्यांचे दोन फलंदाज १९ धावांत गमावले. कर्णधार ईशान किशन ४ आणि रिकी भुई एका धावेवर बाद झाला. त्यानंतर सर्फराजने रिषभ पंतच्या साथीने ८९ धावांची भागीदारी केली. पंतने ८३ चेंडूंत ५७ धावांत ७ चौकार आणि २ षटकार मारले. त्यानंतर सर्फराजने अरमान जाफर (४६)च्या साथीने चौथ्या गड्यासाठी ४८ धावांची भागीदारी केली. संक्षिप्त धावफलक : भारत : ५० षटकांत ८ बाद २५८. (सर्फराज खान ७४, रिषभ पंत ५७, अरमान जाफर ४६, लोमरोर ४५. जॅक गिब्सन ३/५0, नाथन स्मिथ २/३९, रचिन रवींद्र २/४१).न्यूझीलंड : ३१.१ षटकांत सर्व बाद १३८. (फिन अ‍ॅलन २९, क्रिस्टियन लियोपार्ड ४0, अनिकेत पारीख २६, टेलर स्कॉट २९. आवेश खान ४/३२, महिपाल लोमरोर ५/४७).