इपोह : युवा स्ट्रायकर निकिन थिमय्याच्या जबरदस्त हॅट्ट्रिकच्या बळावर भारताने या स्पर्धेतील आपली सर्वोत्तम कामगिरी करताना वर्ल्ड चॅम्पियन आणि गतविजेत्या आॅस्ट्रेलियाला ४-२ गोलफरकाने दे धक्का देताना अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेच्या तिसऱ्या आणि चौथ्या स्थानाच्या प्लेआॅफ लढतीतील स्थान पक्के केले.विजेतेपदाच्या शर्यतीतून आधीच बाद झालेल्या भारताने शनिवारी दडपणाविना खेळताना जबरदस्त खेळ करून आॅस्ट्रेलियन संघाला बॅकफूटवर ढकलले. भारताने चारही क्वॉर्टरमध्ये गोल केले. व्ही. आर. रघुनाथने पहिल्याच मिनिटाला भारताचे गोलचे खाते उघडले. त्यानंतर निकिनने भीमपराक्रम करताना २३व्या, ३२व्या आणि ६०व्या मिनिटाला असे गोल करताना गोलची हॅट्ट्रिक साधत भारताचा चौथा गोल केला. या विजयामुळे भारताचे पाच साखळी लढतींत सात गुण झाले आहेत. आता त्यांचा सामना तिसऱ्या व चौथ्या स्थानाच्या क्लासिफिकेशन सामन्यात उद्या कोरिया अथवा न्यूझीलंडशी होईल. आज भारताचा खेळ एवढा जबरदस्त होता, की त्यांनी दोन गोल सहज गमावल्यानंतर आपल्या कामगिरीत कोणतीही उणीव आॅस्ट्रेलियाला डोके वर काढण्याची उसंत मिळू दिली नाही.या स्पर्धेतील भारताने प्रथमच एवढी जबरदस्त कामगिरी केली आणि पूर्ण ५० मिनिटांत आपली लय कायम ठेवली. भारताची सुरुवातच खूप आक्रमक राहिली आणि पहिल्याच मिनिटात संघाला दोन पेनॉल्टी कॉर्नर मिळाले. रघुनाथने दुसऱ्या पेनॉल्टीचे गोलमध्ये रूपांतर करून भारताची आघाडी दुप्पट केली. हीच लय पुढे कायम ठेवताना पुन्हा दहाव्या मिनिटाला गोल करण्याची संधी मिळवली; परंतु सतबीरसिंहचा प्रयत्न अपयशी ठरला. पुढच्याच मिनिटाला रमणदीपसिंहचा प्रयत्न आॅस्ट्रेलियन गोलरक्षक क्लीमोन्सने हाणून पाडला आणि आकाशदीपसिंहचा रिबाऊंड शॉट बाहेर गेला. पहिल्या क्वॉर्टरच्या अखेरच्या मिनिटात भारतीय डिफेन्स थोडा ढेपाळला आणि त्याचा फायदा घेताना आॅस्ट्रेलियाने बरोबरी साधली. (वृत्तसंस्था)1चौथ्या मिनिटाला सतबीरचा शॉट आॅस्ट्रेलियन गोलरक्षक क्लीमोन्सकडे गेला. काही मिनिटांनंतर निकिनने गोल करत भारताला पुन्हा आघाडीवर नेले. भारतीय गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने दोन मिनिटांनंतर आॅस्ट्रेलियाचे दोन गोल करण्याचे प्रयत्न यशस्वीपणे हाणून पाडले.2 ब्रेकनंतर भारताला आणखी एक संधी मिळाली; परंतु आकाशदीपचा शॉट क्लीमोन्सने रोखला. दरम्यान निकिनने तिसरा गोल करताना भारताची आघाडी ३-१ अशी केली. चौथ्या आणि अखेरच्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक पेनल्टी कॉर्नर गमावला. 3हूटरच्या सात मिनिटांआधी गोडेसने आॅस्ट्रेलियासाठी दुसरा गोल केला; परंतु निकिनने सामना संपण्याच्या अखेरच्या मिनिटाला शानदार कामगिरी करताना रिव्हर्स हिटवर गोल करत भारताचा चौथा गोल केला आणि ४-२ अशा शानदार विजयावर शिक्कामोर्तब केले. निकिनने केलेली गोलची हॅट्ट्रिक ठरली निर्णायकआॅस्ट्रेलियावरील खळबळजनक विजयाने प्लेआॅफ लढतीतील स्थान पक्केव्ही. आर. रघुनाथने पहिल्याच मिनिटाला उघडले भारताचे खातेवर्ल्ड चॅम्पियनवर जवळपास पूर्ण सामन्यातच मिळविले वर्चस्व
भारताचा आॅस्ट्रेलियाला धक्का
By admin | Published: April 12, 2015 2:13 AM