शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
2
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
3
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
4
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
5
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
6
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
7
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
8
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
9
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
10
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
11
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
12
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
13
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
14
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
15
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
16
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
17
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
18
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
19
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
20
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

भारताचे रुत्विका, सिरील, प्रणव-सिक्की उपांत्य फेरीत

By admin | Published: October 08, 2016 3:39 AM

प्रतिकूल परिस्थितीत विजय मिळविताना आज येथे रशियन ओपन ग्रांप्री स्पर्धेत अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीत उपांत्य फेरी गाठली.

व्लादिवोस्तोक (रशिया) : भारतीय बॅडमिंटनपटू रुत्विका, शिवानी गाडे आणि सिरील वर्मा यांनी प्रतिकूल परिस्थितीत विजय मिळविताना आज येथे रशियन ओपन ग्रांप्री स्पर्धेत अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीत उपांत्य फेरी गाठली.चौथ्या मानांकित रुत्विकाने ५२ मिनिटे रंगलेल्या लढतीत स्थानिक खेळाडू अ‍ॅलेना कोमेनद्रोवस्काजा हिला १३-२१, २१-१०, २१-१७ असे पराभूत केले. सॅफ स्पर्धेतील सुवर्णपदकविजेत्या १८ वर्षीय रुत्विकाची पुढील फेरीतील लढत द्वितीय मानांकित सेनिया पोलिकारपोव्हाविरुद्ध होईल.गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विश्व ज्युनिअर चॅम्पियनशिपची फायनल गाठणाऱ्या सिरीलने पुरुष एकेरीत मलेशियाच्या आठव्या मानांकित जुलहेल्मी जुलकिफकली याचा ३६ मिनिटांत २१-१२, २१-१८ असा पराभव केला. सिरील पुढील फेरीत रशियाच्या अनातोली यार्त्सेव्हविरुद्ध दोन हात करील.गेल्या महिन्यात ब्राझील ओपनचे विजेतेपद पटकावणारे एन. सिक्की रेड्डी आणि प्रणव जैरी चोपडा यांनी अलेक्सांद्र वासिलकीन आणि ख्रिस्तिना विरविच या रशियन जोडीचा २१-१०, २१-८ असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. भारताची ही द्वितीय मानांकित जोडी पुढील फेरीत अनातोली यार्त्सेव आणि येवगेनिया कोसेत्साकया या रशियन जोडीविरुद्ध दोन हात करील.(वृत्तसंस्था)