शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

भारताचे दमदार पुनरागमन

By admin | Published: June 13, 2017 4:41 AM

श्रीलंकेविरुद्धच्या निराशाजनक पराभवानंतर भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीचे स्वरूप प्राप्त झालेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेसारख्या दिग्गज संघाच्या आव्हानाला सामोरे

- व्हीव्हीएस लक्ष्मण लिहितात...श्रीलंकेविरुद्धच्या निराशाजनक पराभवानंतर भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीचे स्वरूप प्राप्त झालेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेसारख्या दिग्गज संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. गेल्या लढतीतील पराभवातून सावरताना विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत दमदार पुनरागमन केले. प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये दडपणाखाली दक्षिण आफ्रिका संघाची कामगिरी कामगिरी ढेपाळते, याची पुन्हा एकदा प्रचिती आली. भारतीय संघ या लढतीत नव्या जोमाने खेळला. मैदानावर खेळाडूंची देहबोली, शिस्त, सुरुवातीला भुवनेश्वर व बुमराह यांचा अचूक मारा, चपळ क्षेत्ररक्षण हे बघितल्यानंतर भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्याच्या निर्धाराने मैदानात उतरला असल्याचे दिसून आले. विराटने आपल्या गोलंदाजांना चांगले हाताळले आणि त्यांनी कर्णधाराचा विश्वासही सार्थ ठरविला. नव्या चेंडूने मारा करणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्यामुळे बॅकफूटवर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा डाव गडगडला. दोन देशांदरम्यानच्या मालिकांमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला अद्याप स्पर्धेचे कोडे मात्र सोडविता आलेले नाही. त्यांच्या रणनीतीनुसार धावा फटकावल्या गेल्या नाही, तर त्यांच्यावर दडपण येते. भारतीय गोलंदाजांनी टाकलेल्या निर्धाव षटके व चेंडूंमुळे त्यांचे समीकरण गडबडले. महत्त्वाच्या लढतीचे दडपण अनुभवी फलंदाजांवरही दिसून येते, याचे आश्चर्य वाटते. एबी डिव्हिलियर्स व डेव्हिड मिलर हे दिग्गज फलंदाज धावबाद झाल्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने प्रतिस्पर्धी संघाला वचरढ ठरण्याची संधी बहाल केली. महत्त्वाच्या लढतीत या अनुभवी फलंदाजांनी संघाच्या स्पर्धेतील भविष्यावर प्रश्नचिन्ह लावले. भारतीय संघाने दमदार व सकारात्मक खेळ केला. या खेळपट्टीवर वेगाने धावा पटकावणे शक्य नसून येथे संयमी फलंदाजी करणे आवश्यक असल्याचे भारताच्या लवकर लक्षात आले.गोलंदाज व क्षेत्ररक्षकांच्या चमकदार कामगिरीनंतर शिखर धवनने या जागतिक स्पर्धेत फलंदाजीतील सातत्य कायम राखले. सुरुवातीला विराटला लय गवसली नाही, पण त्याने धीरोदात्त खेळी केली. (गेमप्लॉन)जम बसल्यानंतर त्याने फटकेबाजी केली. भारतीय क्रिकेटसाठी हा शानदार दिवस ठरला.दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या लढतीतील पराभव विसरून भारतीय संघ नव्या जोमाने सज्ज झाला आहे.एजबेस्टनमध्ये खेळल्या जाणाऱ्या उपांत्य लढतीत बांगलादेशला नवा उत्साह संचारलेल्या भारतीय संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. (गेमप्लॉन)