साउथम्पटन : अजिंक्य रहाणो (54 धावा, 5 चौकार) व कर्णधार महेंद्रसिंग धोनी (नाबाद 5क् धावा, 5 चौकार, 1 षटकार) यांच्या अर्धशतकी खेळीसह रविंद्र जडेजा (31) व विराट कोहली (39) यांनी दिलेल्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिस:या कसोटी सामन्यात आज तिस:या दिवसअखेर फॉलोऑन टाळण्याच्या आशा कायम राखल्या. इंग्लंडच्या पहिल्या डावातील 7 बाद 569 (डाव घोषित) धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना भारताने पहिल्या डावात आज तिस:या दिवसअखेर 8 बाद 323 धावांची मजल मारली. भारताला इंग्लंडची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप 246 धावांची गरज असून 2 विकेट शिल्लक आहेत.
फॉलोऑन टाळण्यासाठी भारताला अद्याप 47 धावांची गरज असून टीम इंडियाच्या आशा नाबाद फलंदाज महेंद्रसिंग धोनी (नाबाद 5क्) आणि मोहम्मद शमी (नाबाद 4) यांच्या कामगिरीवर अवलंबून आहेत. भारताचे आघाडीच्या फलंदाज चुकीचे फटके खेळून बाद झाल्यामुळे यजमान इंग्लंडला सामन्यावरील पकड मजबूत करण्यात यश आले.
कालच्या 1 बाद 25 धावसंख्येवरुन पुढे खेळताना भारताच्या जवळजवळ र्सवच फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, पण त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही. इंग्लंडतर्फे जेम्स अॅन्डरसन (3-52) आणि स्टुअर्ट ब्रॉड (3-65) आणि मोईन अली (2-62) यशस्वी गोलंदाज ठरले. रोहित शर्मा (28) आणि अजिंक्य रहाणो (54) यांनी चुकीचे फटके खेळून मोईन अलीला विकेट बहाल केली. रोहितने रहाणोसोबत 74 धावांची भागीदारी केली. मोईन अलीच्या गोलंदाजीवर पुढे सरसावत फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित बाद झाला. त्यानंतर धोनीने जडेजासोबत (31) सातव्या विकेटसाठी 58 धावांची तर भुवनेश्वर कुमारसोबत (19) आठव्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी करीत भारताला तीनशेचा पल्ला ओलांडून दिला.
त्याआधी, भारताची 4 बाद 136 अशी अवस्था असताना अजिंक्य रहाणो व रोहित शर्मा (28) यांनी पाचव्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी करीत डाव सावरला.
रोहित शर्माला मोईन अलीने माघारी परतवत भारताला पाचवा धक्का दिला. विराट कोहलीला (39) चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयश आले. कोहीलला अॅण्डरसनने तंबूचा मार्ग दाखविला. स्टुअर्ट ब्रॉडने उपाहारापूर्वी
मुरली विजय (35) आणि चेतेश्वर पुजारा (24) यांना माघारी परतवत इंग्लंडला वर्चस्व मिळवून दिले. त्यावेळी भारताची 3 बाद 88 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर विराट कोहली व अजिंक्य रहाणो यांनी संयमी फलंदाजी करीत भारताला उपाहारार्पयत 3 बाद 1क्8 धावांची मजल मारून दिली.
धावफलक
4इंग्लंड पहिला डाव 7 बाद 569 (डाव घोषित) 4भारत पहिला डाव :- मुरली विजय त्रि. गो. ब्रॉड 35, शिखर धवन ङो. कुक गो. अॅन्डरसन क्6, चेतेश्वर पुजारा ङो. बटलर गो. ब्रॉड 24, विराट कोहली ङो. कुक गो. अॅन्डरसन 39, अजिंक्य रहाणो ङो. टेरी (बदली खेळाडू) गो. अली 54, रोहित शर्मा ङो. ब्रॉड गो. अली 28, महेंद्रसिंग धोनी खेळत आहे 5क्, रवींद्र जडेजा पायचित गो. अॅन्डरसन 31, भुवनेश्वर कुमार ङो. बॅलन्स गो. ब्रॉड 19, मोहम्मद शमी खेळत आहे क्4. अवांतर (33). एकूण 1क्2 षटकांत 8 बाद 323. बाद क्रम : 1-17, 2-56, 3-88, 4-136, 5-21क्, 6-217, 7-275, 8-313. गोलंदाजी : जेम्स अॅन्डरसन 24-9-52-3, स्टुअर्ट ब्रॉड 23-6-65-3, जॉर्डन 17-4-59-क्, ािस व्होक्स 2क्-8-6क्-क्, मोईन अली 18-क्-62-2.