शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
2
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
3
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
4
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
5
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
6
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
7
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
8
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
9
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
10
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
11
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
12
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
13
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
14
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
15
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
16
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
17
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
18
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
19
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
20
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी

भारताची दमदार विजयी सलामी

By admin | Published: January 29, 2016 3:36 AM

मुंबईकर सर्फराज खान व वॉशिंग्टन सुंदर यांनी केलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी देताना आयर्लंडचा ७९ धावांनी

मिरपूर : मुंबईकर सर्फराज खान व वॉशिंग्टन सुंदर यांनी केलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी देताना आयर्लंडचा ७९ धावांनी धुव्वा उडवला.शेर-ए-बांगला स्टेडियवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून आयर्लंडने भारतीयांना प्रथम फलंदाजी दिली. आयर्लंडने भारताची १६.५ षटकांत ४ बाद ५५ अशी अवस्था केली. यानंतर सर्फराज (७४) व वॉशिंग्टन (६२) यांनी भारताला आव्हानात्मक मजल मारून दिली. या दोघांच्या जोरावर भारताने ५० षटकांत ९ बाद २६८ धावांची मजल मारली.धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा ४९.१ षटकांत १८९ धावांत खुर्दा उडाला. राहुल बाथम याने ८ षटकांत केवळ १५ धावा देऊन ३ बळी घेतले, तर अवेश खान व महिपाल लोमरोर यांनी प्रत्येकी २ बळी घेऊन त्याला चांगली साथ दिली. झिशान अन्सारीने एक बळी घेतला. भारतीयांनीही आयर्लंडच्या आघाडीच्या फलंदाजीला खिंडार पाडताना त्यांची १६.२ षटकांत ४ बाद ४६ अशी अवस्था केली होती. मात्र, लॉर्कन टकर व विल्यम मॅकक्लिंटॉक यांनी ११३ धावांची संथ भागीदारी करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला.तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार ईशान किशन, रिषभ पंत, रिकी भुई व अरमान जाफर हे स्वस्तात परतल्याने भारताने ५५ धावांत ४ गडी गमावले. यावेळी भारताला सावरताना सर्फराजने ७० चेंडूंत ७ चौकारांसह ७४ धावा फटकावल्या. त्याला पुरेपूर साथ देताना वॉशिंग्टनने ७१ चेंडूंत ३ चौकारांसह ६२ धावांची संयमी खेळी केली. तसेच, झिशानने ३६ चेंडूंत ३६ धावा काढताना २ चौकार लगावले.