शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

भारताचा लंकेवर दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2016 1:38 AM

सलामीवीर शिखर धवनचे (५१) आंतरराष्ट्रीय टी-२० मधील पहिलेवहिले तडाखेबंद अर्धशतक आणि त्याला उपयुक्त साथ दिलेल्या रोहित शर्मा (४३) यांच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी२० सामन्यात श्रीलंकेचा

रांची : सलामीवीर शिखर धवनचे (५१) आंतरराष्ट्रीय टी-२० मधील पहिलेवहिले तडाखेबंद अर्धशतक आणि त्याला उपयुक्त साथ दिलेल्या रोहित शर्मा (४३) यांच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी२० सामन्यात श्रीलंकेचा ६९ धावांनी धुव्वा उडवला. या महत्त्वपूृण विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.नाणेफेक जिंकून लंकेने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारताने निर्धारीत २० षटकांत ६ बाद १९६ अशी आव्हानात्मक मजल मारली. दरम्यान, १९व्या षटकात थिसारा परेराने घेतलेल्या हॅट्ट्रीकमुळे भारताच्या धावसंख्येला खीळ बसली. यानंतर भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना पाहुण्यांचा डाव ९ बाद १२७ धावांवर रोखताना संघाच्या दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले. अश्विनने सुरुवातीला सलामीवीर तिलकरत्ने दिलशानला भोपळाही फोडू दिला नाही. तर अनुभवी आशिष नेहराने झ्टपट २ बळी घेताना लंकेची ३ बाद १६ धावा अशी केविलवाणी अवस्था केली. यानंतर कर्णधार दिनेश चंडीमल (३१), चमारा कपुगेदेरा (३२), मिलिंदा सिरीवर्दना (नाबाद २८) आणि दासून शनाका (२७) यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीयांनी टिच्चून मारा करताना त्यांना अखेरपर्यंत दबावाखाली ठेवले. आर. अश्विनने ३, तर नेहरा आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ बळी घेत लंकेला रोखले. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना शिखर - रोहित लंकेच्या गोलंदाजीवर तुटून पडले. त्यांनी १२हून अधिक धावगतीने फटकेबाजी मारताना ७५ धावांची आक्रमक सलामी दिली. धवनने २५ चेंडूत ७ चौकार व २ षटकारांसह ५१ धावांच तडाखा दिला. दुशमंथ चमीराने धवनला बाद केले. यानंतर रोहितने अजिंक्य रहाणेच्या (२५) साथीने ४७ धावांची भागीदारी केली. पुन्हा एकदा चमीराने लंकेला यश मिळवून देताना आपल्याच गोलंदाजीवर रोहितचा अप्रतिम झेप घेतला. परेराने १९ वे निर्णायक षटक टाकताना अखेरच्या तीन चेंडूवर हार्दिक पांड्या, सुरेश रैना आणि युवराज सिंग यांना बाद करुन भारतीयांना रोखण्यात मोलाची भूमिका बजावली. ‘लोकल बॉय’ कर्णधार महेंद्रसिंग धोणीही अपयशी ठरला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :भारत : २० षटकांत ६ बाद १९६ धावा (शिखर धवन ५१, रोहित शर्मा ४३, सुरेश रैना ३०; थिसारा परेरा ३/३३, दुशमंता चमीरा २/३८) वि.वि. श्रीलंका : २० षटकांत ९ बाद १२७ धावा (चमारा कपुगेदेरा ३२, दिनेश चंडिमल ३१, मिलिंदा सिरीवर्दना नाबाद २८; आर. अश्विन ३/१४, रविंद्र जडेजा २/२४, आशिष नेहरा २/२६)