"भारताचं विश्वविजेतेपद ऐतिहासिक अन् तरुणांसाठी प्रेरणादायी"; चहुबाजूंनी खो-खो टीमचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 14:34 IST2025-01-20T14:30:50+5:302025-01-20T14:34:18+5:30

राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वांनी केलं तोंडभरून कौतुक

India's World Cup win is historic! This victory is an inspiration for countless youngsters! Praise from all around | "भारताचं विश्वविजेतेपद ऐतिहासिक अन् तरुणांसाठी प्रेरणादायी"; चहुबाजूंनी खो-खो टीमचे कौतुक

"भारताचं विश्वविजेतेपद ऐतिहासिक अन् तरुणांसाठी प्रेरणादायी"; चहुबाजूंनी खो-खो टीमचे कौतुक

India World Champions, Kho Kho World Cup 2025 : भारतात नुकताच पार पडलेल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या हंगामात पुरूष आणि महिला दोन्ही गटात भारतीय संघाने बाजी मारली. कमालीची गती अन् चपळाईसह योग्य रणनीतीचं कसब दाखवून देत भारतीय महिला संघाने ७८-४० अशा फरकाने खो-खो वर्ल्डकप जिंकला. दुसरीकडे महिला संघापाठोपाठ पुरुष संघानेही ५४-३६ असा फरक राखत विश्वविजेतेपद पटकावले. दोन्ही गटात भारताने नेपाळचा अंतिम सामन्यात पराभव केला. भारताच्या या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला.

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या...

पहिल्या खो खो विश्वचषक जिंकल्याबद्दल मी दोन्ही भारतीय संघांचे, महिला आणि पुरुष संघांचे मनापासून अभिनंदन करते. आपल्या देशातील या पारंपारिक खेळात भारतीय खेळाडूंनी आपले वर्चस्व दाखवले आहे. मला खात्री आहे की आपल्या मुली आणि मुलांचे ऐतिहासिक यश आपल्या तरुणांना प्रेरणा देईल आणि हा खेळ अधिक लोकप्रिय करेल. भविष्यात दोन्ही संघांना यश मिळो या शुभेच्छा.

पंतप्रधान मोदी म्हणाले...

पहिला खो खो विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय महिला संघाचे अभिनंदन! हा ऐतिहासिक विजय त्यांच्या अतुलनीय कौशल्य, दृढनिश्चय आणि टीमवर्कमुळे मिळाला आहे. या विजयामुळे भारतातील सर्वात जुन्या पारंपारिक खेळांपैकी एक असलेला खेळ अधिक प्रकाशझोतात आला. देशभरातील असंख्य तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळाली. या कामगिरीमुळे येणाऱ्या काळात अधिक तरुणांना या खेळात सहभागी होण्यासाठी मार्ग मोकळा होईल. खो खो विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय पुरुष खो खो संघाचाही मला अभिमान आहे. त्यांची कामगिरी अविश्वसनीय आहे. त्यांची जिद्द आणि समर्पण कौतुकास्पद आहे. हा विजय तरुणांमध्ये खो खो अधिक लोकप्रिय होण्यास हातभार लावेल.

------------------

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...

परंपरेपासून विजयापर्यंत! महिला संघाने पहिला खो खो विश्वचषक जिंकला! अविश्वसनीय कामगिरी! पहिला खो खो विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय महिला संघाचे मनापासून अभिनंदन! हा उल्लेखनीय विजय त्यांच्या अतुलनीय कौशल्य, दृढनिश्चय आणि टीमवर्कचे प्रतिबिंब आहे. महाराष्ट्राच्या अभिमानाच्या वैष्णवी पवार आणि प्रियंका इंगळे यांचे त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल विशेष कौतुक. ही कामगिरी असंख्य तरुण प्रतिभांना या अविश्वसनीय खेळात सहभागी होण्यासाठी आणि उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देवो! भारतीय पुरुष खो खो संघानेही विश्वचषक विजयासह इतिहास रचला! भारतीय पुरुष खो खो संघाचे अभिनंदन! महाराष्ट्रातील भारतीय संघाचा कर्णधार प्रतीक वायकर, आदित्य गणपुले, रामजी कश्यप, अनिकेत पोटे आणि सुयश गरगटे यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे विशेष कौतुक. हा विजय आपल्या समृद्ध वारशाचे प्रतीक आहे. पुढच्या पिढीला पारंपारिक खेळांना स्वीकारण्यासाठी आणि त्यात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरणादायी मार्ग आहे.

---

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले...

खो खो स्पर्धा जिंकून विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांतील खेळाडू तसेच संघ प्रशिक्षकांचे अभिनंदन. विश्वविजेत्या भारतीय संघात कर्णधार प्रतीक वाईकर याच्यासह सुयश गरगटे, अनिकेत पोटे, आदित्य गणपुले व रामजी कश्यप या पाच महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश होता. तर विश्वविजेत्या महिला संघात कर्णधार प्रियांका इंगळे हिच्यासह अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, वैष्णवी पवार या महिला खेळाडू महाराष्ट्राच्या होत्या. या खेळाडूंसह पुरुष संघाचे प्रशिक्षक पुण्याचे शिरीन गोडबोले, महिला संघाच्या प्रशिक्षक पुण्याच्या प्राचीताई वाईकर तसेच फिजिओथेरेपिस्ट डॉ. अमित रावहाटे या साऱ्यांचे अभिनंदन. भविष्यातील यशस्वी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा, अशा भावना उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

Web Title: India's World Cup win is historic! This victory is an inspiration for countless youngsters! Praise from all around

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.