शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
2
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
3
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
4
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
6
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
7
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
8
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
9
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र
10
“राहुल गांधीची भूमिका संविधान बचाओ, फडणवीसांना शहरी नक्षलवाद का वाटतो?”; काँग्रेसचा सवाल
11
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
12
'बविआ'समोर भाजपचे आव्हान! जागा शिंदेंच्या पण उमेदवार भाजपचे
13
"काहीही झालं तरी जातनिहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणारच"
14
"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...
15
'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय?
16
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
17
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
18
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
19
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
20
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

भारत-इंग्लंड लढत अनिर्णीत

By admin | Published: November 14, 2016 1:55 AM

कर्णधार विराट कोहलीच्या लढवय्या खेळीमुळे भारताला प्रतिकूल परिस्थितीत इंग्लंडविरुद्ध रविवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी संपलेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यश आले.

राजकोट : कर्णधार विराट कोहलीच्या लढवय्या खेळीमुळे भारताला प्रतिकूल परिस्थितीत इंग्लंडविरुद्ध रविवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी संपलेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यश आले. इंग्लंडच्या पहिल्या डावात ११७ धावांची खेळी करणारा आणि लढतीत एकूण ३ बळी घेणारा अष्टपैलू मोईन अली सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. उभय संघांदरम्यान दुसरा कसोटी सामना १७ नोव्हेंबरपासून विशाखापट्टणममध्ये खेळला जाणार आहे. कर्णधार कुकच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारतापुढे विजयासाठी ३१० धावांचे आव्हान ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना लेग स्पिनर आदिल राशिद (३-६४), डावखुरा फिरकीपटू जफर अन्सारी (१-४१) व मोईन अली (१-४७) यांच्या अचूक माऱ्यापुढे भारताची एक वेळ ४ बाद ७१ अशी अवस्था झाली होती, पण कर्णधार कोहली (नाबाद ४९), रविचंद्रन आश्विन (३२), रवींद्र जडेजा (नाबाद ३२) व मुरली विजय (३१) यांच्या खेळीच्या जोरावर यजमान संघाने ६ बाद १७२ धावांची मजल मारत सामना अनिर्णीत राखला. त्याआधी, कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने (१३०) शानदार फलंदाजी करताना कारकिर्दीतील ३० वे शतक झळकावले. इंग्लंडने दुसरा डाव ३ बाद २६० धावसंख्येवर घोषित करीत भारतापुढे ४९ षटकांत ३१० धावा फटकावण्याचे लक्ष्य ठेवले. चार वर्षांपूर्वी भारत दौऱ्यावर चमकदार कामगिरी करणाऱ्या कुकने कामगिरीत सातत्य राखताना भारताविरुद्ध सहावे, तर भारतात पाचवे शतक ठोकले. विदेशी फलंदाजातर्फे भारतात झळकावलेली ही सर्वाधिक शतके आहेत. कुकने विंडीजचे एवर्टन विक्स व क्लाईव्ह लॉईड आणि दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला यांना पिछाडीवर सोडले. यांच्या नावावर भारतात प्रत्येकी चार शतकांची नोंद आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकात ख्रिस व्होक्सने गौतम गंभीरला माघारी परतवले. त्या वेळी संघाचे खातेही उघडले नव्हते. पुजारा (१८) चहापानापूर्वी रशिदचे लक्ष्य ठरला. पुजारा व विजय यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. विजयला वैयक्तिक १३ धावांवर असताना अन्सारीने स्वत:च्या गोलंदाजीवर जीवदान दिले, पण त्याला त्याचा लाभ घेता आला नाही. चहापानानंतर रशिदच्या गोलंदाजीवर तो हमीदकडे झेल देत माघारी परतला. अजिंक्य रहाणे (१) दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. मोईन अलीने त्याला तंबूचा मार्ग दाखविला. त्या वेळी भारताची ४ बाद ७१ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर कोहली व आश्विन यांनी संयमी फलंदाजी करीत डाव सावरला. कोहली व आश्विन यांनी १५ पेक्षा अधिक षटके इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. दरम्यान, आश्विनने अन्सारीच्या गोलंदाजीवर तीन चौकार ठोकले आणि याच षटकात कव्हरमध्ये जो रुटकडे झेल देत माघारी परतला. त्याने ५३ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकाराच्या मदतीने ३२ धावा केल्या. रिद्धिमान साहाला (९) खेळपट्टीवर अधिक वेळ तग धरता आला नाही. त्यानंतर कोहलीने जडेजाच्या साथीने डाव सावरला. त्यानी सातव्या विकेटसाठी १० षटकांत ४० धावांची अभेद्य भागीदारी करीत इंग्लंडच्या विजय मिळवण्याच्या आशा धुळीस मिळवल्या. कोहलीने ९८ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार ठोकले, तर जडेजाच्या ३३ चेंडूंच्या खेळीमध्येही सहा चौकारांचा समावेश आहे. त्याआधी, सकाळच्या सत्रात लेग स्पिनर अमित मिश्राने ११ चेंडूंच्या अंतरात २ बळी घेतले, पण कुकच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने आपली स्थिती मजबूत केली. पहिल्या डावात केवळ १ बळी घेणाऱ्या मिश्राने आज आपल्या पहिल्या दोन षटकांत सलामीवीर हसीब हमीद (८२) व जो रुट (४) यांना तंबूचा मार्ग दाखवला. (वृत्तसंस्था)