शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
2
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
3
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
4
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
5
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
6
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
7
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
8
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
9
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
10
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
11
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
13
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
14
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
15
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
16
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
17
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
18
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
19
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
20
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार

भारत-पाक महिला क्रिकेट मालिका रद्द?

By admin | Published: October 18, 2016 4:30 AM

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उभय देशांच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान आयोजित क्रिकेट मालिका रद्द होण्याच्या स्थितीत आहे.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उभय देशांच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान आयोजित क्रिकेट मालिका रद्द होण्याच्या स्थितीत आहे. आॅक्टोबरअखेरीस ही मालिका खेळली जाणार होती. या मालिकेच्या आयोजनावर आयसीसी महिला चॅम्पियनच्या गुणांचा निर्णय अवलंबून आहे. बीसीसीआयने पीसीबीला अद्यापही मालिका खेळण्याचे किंवा रद्द करण्याचे संकेत दिलेले नाहीत. मालिका रद्द झाल्यास गुणविभागणीचा निर्णय चॅम्पियनशिपची तांत्रिक समिती घेईल, असे ‘क्रिकइन्फो’च्या वृत्तात म्हटले आहे.आयसीसीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार पाकच्या यजमानपदाखाली होणाऱ्या या मालिकेत सहभागी होण्यास भारताने नकार दिल्यास गुण मिळणार नाहीत. मालिकेत उभय संघांत तीन वन डे खेळले जाणार आहेत. पीसीबी या सामन्यांचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये करण्यास इच्छुक आहे. आयसीसी महिला चॅम्पियनशिपनंतर आघाडीच्या चार स्थानांवर राहणाऱ्या संघांचा प्रवेश २०१७ मध्ये इंग्लंडमध्ये आयोजित विश्वचषकात निश्चित मानला जाईल. नंतरच्या चार स्थानांवर राहणाऱ्या संघांना मात्र पात्रता फेरी खेळावी लागेल. भारत-पाकला या महिन्याअखेरपर्यंत मालिका खेळायची आहे. पण मालिका न झाल्यास तांत्रिक समितीकडे अहवाल सोपविला जाईल. बीसीसीआयने मेपासून आतापर्यंत मालिकेबाबत पीसीबीला स्पष्टीकरण दिलेले नाही. आमच्याकडे निर्णय घेण्याचा अधिकार नसून सरकारच्या परवानगीशिवाय काहीच करू शकत नसल्याचे बीसीसीआय अधिकाऱ्यांचे मत आहे. (वृत्तसंस्था)>लक्षवेधी...भारतीय पुरुष संघाने पाकविरुद्ध २०१२-१३ पासून द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. तथापि पाकने भारताच्या यजमानपदाखाली झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकात आणि वन-डे विश्वचषकासह चॅम्पियन्स ट्रॉफी व आशिया चषक क्रिकेटमध्ये भाग घेतला होता. भारत-पाक यांच्यात मे २०१४ मध्ये एक करार झाला. याअंतर्गत उभय देश २०१५ ते २०२३ या कालावधीत सहा मालिका खेळतील, असे ठरले होते. गतवर्षी डिसेंबरमध्ये पाकच्या यजमानपदाखालीभारताविरुद्ध मालिकेचे आयोजन व्हायचे होते. यावर अनेक खलबते झाल्यानंतर भारताने ही मालिका रद्द केली होती.