शहरं
Join us  
Trending Stories
1
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
5
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
6
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
7
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
8
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
9
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
10
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
11
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
12
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
13
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
14
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
15
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
16
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
18
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
19
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
20
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

भारत-विंडीज लढत अनिर्णीत

By admin | Published: July 18, 2016 6:13 AM

भारताच्या उर्वरित गोलंदाजांना शनिवारी विंडीज बोर्ड अध्यक्ष एकादशविरुद्ध अनिर्णीत संपलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात छाप सोडता आली नाही.

बासेटेरे : आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विनचा अपवाद वगळता भारताच्या उर्वरित गोलंदाजांना शनिवारी विंडीज बोर्ड अध्यक्ष एकादशविरुद्ध अनिर्णीत संपलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात छाप सोडता आली नाही. भारतीय गोलंदाज या लढतीत विकेट घेण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले.बोर्ड एकादशने शनिवारी १ बाद २६ धावसंख्येवरून दुसऱ्या डावाला सुरुवात केली. दिवसअखेर बोर्ड एकादशने दुसऱ्या डावात ८६ षटकांत ६ बाद २२३ धावांची मजल मारली होती. भारताने बोर्ड एकादशचा पहिला डाव १८० धावांत गुंडाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ३६४ धावांची मजल मारली होती. आश्विनने ५९ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. त्याने प्रभावी मारा करताना तिसऱ्या दिवशी दोन बळी घेतले. अन्य भारतीय गोलंदाज मात्र बळी घेण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. भारताच्या वेगवान गोलंदाजांना बोर्ड अध्यक्ष एकादशविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सराव सामन्यातही छाप सोडता आली नव्हती. आता सर्वांचे लक्ष भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान २१ जुलैपासून अ‍ॅन्टिग्वामध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यावर केंद्रित झाले आहे. शार्दूल ठाकूर व रवींद्र जडेजा यांनी शनिवारी गोलंदाजीची सुरुवात केली. ठाकूरने अचूक मारा करीत फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. विंडीजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी सराव सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली आणि स्टार फिरकीपटू रविचंद्रन आश्विन यांना गवसलेला सूर भारतीय संघासाठी दिलासा देणारी बाब ठरली. विराटने अर्धशतकी खेळी केली तर आश्विनने दोन्ही डावांत एकूण ६ बळी घेतले. आश्विनने पहिल्या डावात रवींद्र जडेजा व अमित मिश्रा या फिरकीपटूंच्या साथीने विंडीज एकादशचा डाव १८० धावांत गुंडाळला. आश्विन व जडेजाने प्रत्येकी तीन तर मिश्राने दोन बळी घेतले. (वृत्तसंस्था)विंडीज संघाच्या व्यवस्थापकपदी गॉर्नरकिंग्स्टन : माजी वेगवान गोलंदाज आणि ‘बिग बर्ड’ नावाने ओळखले जाणारे जोएल गॉर्नर यांची वेस्ट इंडिज संघाच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली. भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत गॉर्नर विंडीज संघासोबत असतील.गॉर्नर यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा राहील. त्यांनी यापूर्वी २००९-१० मध्ये संघाला सेवा प्रदान केली होती. त्या वेळी टी-२० विश्वकप स्पर्धेदरम्यान त्यांनी प्रभारी व्यवस्थापकपद सांभाळले होते. त्यांनी यापूर्वी विंडीज क्रिकेट बोर्डाचे संचालकपद, बार्बाडोस क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद आणि विंडीज क्रिकेट संघाचे व्यवस्थापकपद सांभाळलेले आहे.६३ वर्षीय गॉर्नर यांनी विंडीज क्रिकेटच्या हितासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. विंडीज क्रिकेटला सहकार्य करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब असून, संघाच्या व्यवस्थापकपदी निवड झाल्यामुळे आनंद झाला, अशी प्रतिक्रिया गॉर्नर यांनी व्यक्त केली.