ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळलेला गोळाफेकपटू इंद्रजीत सिंगने त्याच्यावरील आरोप फेटाळून लावला आहे. आपल्या विरोधात कारस्थान रचले असून, चाचणीसाठी घेतलेल्या माझ्या नमुन्यांशी छेडछाड झाल्याचा आरोप इंद्रजीतने केला आहे.
देशात जो कोणी बोलण्याचा प्रयत्न करतो. त्याचा आवाज बंद केला जातो. माझ्या नमुन्यांशी छेडछाड झाली आहे. जे शरीराला चांगले नाही त्याचे कोण कशाला सेवन करेल असे इंद्रजीत म्हणाला. मागच्यावर्षी मी ५० डोप चाचण्या दिल्या. यावर्षी सुद्धा देत आहे.
त्यानंतरही माझे तोंड बंद करण्यासाठी मोहिम उघडण्यात आली आहे असे इंद्रजीत म्हणाला. नरसिंग यादव पाठोपाठ इंद्रजीत दोषी आढळल्याने भारताच्या रिओ ऑलिम्पिकच्या तयारीला धक्का लागला आहे. एशियन चॅम्पिअनशिप, एशिअन ग्रँड प्रिक्स आणि वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवणा-या इंद्रजित सिंह रिओ रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला खेळाडू होता.