शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

ऑलिम्पिक पदकासाठी पी. व्ही. सिंधूने ठेवलीय शोकेसमध्ये जागा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 3:04 AM

इतरही चषकांच्या रांगेत असेल सिंधूचा हा स्वप्नवत चषक : प्रयत्नांची पराकाष्ठा करणार

मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने नुकतेच विश्व चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. रिओ ऑलिम्पिक सोडला तर तिच्याकडे जवळपास सर्वच चषक आहेत. या स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभूत झाल्याचे दु: ख तिला होते, मात्र विश्व चॅम्पियनशीपचा किताब मिळवल्यानंतर हे दु:ख हलके झाले. आता पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो आॅलिम्पिकचा चषक जिंकण्याकडे सिंधूच्या नजरा आहेत त्यासाठी तिने आपल्या ट्रॉफ्रीच्या कॅबिनेटमध्ये (शोकेसमध्ये) एक जागा राखीव ठेवली आहे ती खास ऑलिम्पिक चषकासाठी.

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूने बासेलमध्ये आपल्या सलग तिसºया फायनलमध्ये जपानच्या नोजोमी ओकुहाराचा २१-७, २१-७ ने पराभव करीत विश्व चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक पटकाविले होते. या ऐतिहासिक कामगिरीपूर्वी २४ वर्षीय सिंधूने रिओ आॅलिम्पिक, विश्व चॅम्पियनशीप (२०१७, २०१८) २०१७ दुबई सिरिज फायनल्स, २०१८ राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा आणि जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.

एका वृत्तसंस्थेशी दिलेल्या मुलखतीत सिंधू म्हणाली की, विश्व चॅम्पिनशीपमधील सुवर्णपदक हे आतापर्यंतच्या सर्व पराभवांना दूर नेणारे आहे. लोक माझ्यावर टीक करीत होते. फायनलमध्ये मी जिंकू शकत नाही, असे बोलले जात होते. या सर्वांना माझ्या परिने उत्तर दिले आहे. असे असले तरीही ऑलिम्पिक स्पर्धा फार वेगळी असते. रिओ आणि विश्व चॅम्पियनशीप स्पर्धेने मला वेगळ्या आठवणी दिल्या आहेत आणि हा...एक सुवर्ण शिल्लक आहे. ते जिंकल्यानंतर त्याची माझ्या कॅबिनेटमध्ये खास जागा असेल. मी निश्चितपणे, ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकासाठी शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करीन. टोकियो ऑलिम्पिक हेच माझे ध्येय आहे. ऑलिम्पिक क्वालिफिकेशन्स सुरू आहेत आणि विजय मिळवत त्यादृष्टिने पुढे जाण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे.रिओनंतर सर्व काही बदलले२०१६ मध्ये रिओ हे माझे पहिले ऑलिम्पिक होते. तेव्हा मला जास्त लोक ओळखत नव्हते. एक खेळाडू म्हणून थोडी परिचित होते. रिओनंतर मात्र सर्व काही बदलले. आता विश्व चॅम्पियनशीपनंतर बºयाच गोष्टी घडत आहेत. मला प्रत्येक स्पर्धेतून नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. प्रतिस्पर्धी खेळाडूजवळ माझ्याविरुद्ध खेळण्याची काही ना काही रणनिती असते ती आपल्यालाही ओळखता आली पाहिजे.ऑलिम्पिक प्रतिस्पर्ध्यांबाबतड्रॉ काढल्यानंतर निश्चितपणे आघाडीचे खेळाडू हेच प्रतिस्पर्धी असतील. मी मानांकनाचा विचार करीत नाही. तुम्ही चांगला खेळ करण्याचा विचार करा. त्यावर लक्ष केंद्रित केले तर कामगिरी चांगली होईल. इतर गोष्टीकउे दुर्लक्ष करणे हेच महत्त्वाचे आहे.

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू