कॅनोसा शाळेची उपांत्य फेरीत धडक आतंर शालेय फुटबॉल स्पर्धा
By admin | Published: September 20, 2015 12:53 AM
मुंबई : सियेन्का डिसील्व्हा आणि आकांक्षा अक्रे या जोडीने केलेल्या दमदार प्रदर्शनामुळे कॅनोसा शाळेने फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली. मुंबई शालेय क्रिडा संघटना आयोजित १६ वर्षांखालील मुलींच्या गटात माहिमच्या कॅनोसा शाळेने बी.पी रोडवरील ग्रीनलॉन्स शाळेचा २-० असा पराभव करुन उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. आझाद मैदानावरील मुंबई शालेय क्रिडा ...
मुंबई : सियेन्का डिसील्व्हा आणि आकांक्षा अक्रे या जोडीने केलेल्या दमदार प्रदर्शनामुळे कॅनोसा शाळेने फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली. मुंबई शालेय क्रिडा संघटना आयोजित १६ वर्षांखालील मुलींच्या गटात माहिमच्या कॅनोसा शाळेने बी.पी रोडवरील ग्रीनलॉन्स शाळेचा २-० असा पराभव करुन उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. आझाद मैदानावरील मुंबई शालेय क्रिडा संघटनेच्या मैदानात हे सामने खेळवण्यात आले. कॅनोसा विरुध्द ग्रीनलॉन्स शाळेत झालेल्या सामन्यात १८ व्या मिनिटाला आकांक्षाने दणदणीत गोल केला. सियेन्काच्या पासवर ग्रीनलॉन्सच्या बचावफळीला चकवा देत आकांक्षाने आपल्या संघाचे खाते उघडले. १-० अशा पिछाडी नंतर सामन्यात परतण्यासाठी ग्रीनलॉन्सच्या खेळाडूंनी प्रयत्न केले, पण कॅनोसाच्या भक्कम बचाबफळीला भेदण्यास त्यांना अपयश आले. मध्यातंरानंतर ३२ व्या मिनिटाला सियेन्काने आक्रमकपणे गोल नोंदवला. बॉल वरील नियंत्रण आणि आक्रमकपणा यांचा योग्या समतोल साधत सियेन्काच्या दुसर्या गोलने २-० असा विजय नोंदवला. या विजया सोबतच कॅनोसा शाळेने स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले. दरम्यान, फोर्टच्या जे.बी.पेट्रिट शाळेने अंधेरीच्या कॅनोसा शाळेवर २-० अशी मात केली. जे.बी शाळेकडून ऊर्वी यार्नल आणि लिआ माऊंटोनेटने प्रत्येकी एक गोल लगावला. कुपरेज मैदानावरील उपांत्य फेरीत जे.बी शाळा आणि माहिमची कॅनोसा यांच्यात कडवी झुंज प्रेश्रकांना पाहायला मिळेल. (क्रीडा प्रतिनिधी)