पुणे : पुणे मनपा शिक्षण मंडळ आणि जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे आयोजित आंतरशालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात सौरभ म्हमाणे, ओम चोरडिया, अश्विन दीपक यांनी शनिवारी सहाव्या फेरीअखेर मुलांच्या गटात संयुक्तपणे आघाडी घेतली.
खराडी येथील राजाराम भिकू पठारे प्राथमिक विद्यालयाच्या वि. मा. पठारे इनडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे. मुलांच्या गटात झालेल्या सहाव्या फेरीत ज्ञानगंगा स्कूलच्या सौरभ म्हमाणे याने कॅ म्प येथील बिशप्स स्कूलच्या रूशित पलेशा याच्यावर मात केली. मनसुखभाई कोठारी हायस्कूलच्या ओम चोरडिया याने अशोक विद्यालयाच्या रोहित देवल याला पराभूत करत ६ गुणांची कमाई केली.१७ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये आर्या पिसे, सानिया सापळे, श्रावणी हलकुडे, सिया जोशी या खेळाडूंनी तिसऱ्या फेरीअखेर ३ गुणांसह संयुक्तपणे आघाडी घेतली आहे. एसपीएम हायस्कूलच्या आर्या हिने आरसीएम गुजराती हायस्कूलच्या दीपिका माहेश्वरी हिच्यावर विजयाची नोंद केली. सानिया सापळे हिने सलग दुसरा विजय मिळविताना आगरकर हायस्कूलच्या रितू शेवकर हिला नमविले.मुले : सहावी फेरी :दिगंबर जाईल (भारतीय विद्याभवन, ५.५) बरोबरी वि. ओम लामकाने (विद्यापीठ हायस्कूल, ५.५), रूशित पलेशा (बिशप्स स्कूल, कॅ म्प, ५) पराभूत वि. सौरभ म्हमाणे (ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल, ६), रोहित देवल (अशोक विद्यालय, ५) पराभूत वि. ओम चोरडिया ( मनसुखभाई कोठारी नॅशनल स्कूल, ६). अश्विन दीपक (सेंट जोसेफ हायस्कूल, ६) विवि डी. आपटे (न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, ४.५), सोहम भोईर (डीएव्ही पब्लिक स्कूल, ५.५) विवि अथर्व परूळेकर (डॉ. श्यामराव कलमाडी हायस्कूल, ४.५), आर्चित खरे (ट्री हाऊस हायस्कूल, ५.५) विवि राजवर्धन सिंघी (डॉ. श्यामराव कलमाडी हायस्कूल, ४.५). अथर्व डिंगरे (सिटी इंटरनॅशनल स्कूल, कोथरूड, ४.५) पराभूत वि. कुश गादिया (बिशप्स स्कूल, कॅ म्प, ५.५).मुली : तिसरी फेरी :दीपिका माहेश्वरी (आरसीएम गुजराती हायस्कूल, २) पराभूत वि. आर्या पिसे (एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल, ३), रितू शेवकर (आगरकर हायस्कूल, २) पराभूत वि. सानिया सापळे (विखे पाटील हायस्कूल, ३), रूचा देशमुख (क्रिसेंट हायस्कूल, २) पराभूत वि. श्रावणी हलकुडे (बंडोजी खंडोजी चव्हाण हायस्कूल, ३), श्रुती परांजपे (विद्ययानिकेतन, २) पराभूत वि. सिया जोशी (एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल, ३), अनुष्का चौधरी (नूमवि, ३) विवि शर्वरी इनामदार (अहिल्यादेवी हायस्कूल, २), श्रुती सी. (निर्मला स्कूल, २) पराभूत वि. श्रीवणी आंबवले (अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल, ३), सिद्धी पारकर (सरदार दस्तूर, २) पराभूत वि. मानसी ठाणेकर (डॉ. जी. जी. शाह इंग्लिश मीडियम स्कूल, ३).