- नेमानजा मॅटिकशी बातचीत...प्रीमियर लीग स्पर्धेत यंदा फॉर्ममध्ये असलेल्या चेल्सीचा आगामी सामना तुल्यबळ आर्सेनालविरुध्द होणार आहे. विशेष म्हणजे चेल्सीचा स्टार खेळाडू नेमानजा मॅटिक या सामन्याकडे वचपा काढण्याच्या नजरेने पाहत असून यंदा सुरुवातीला झालेला आर्सेनालविरुध्दचा पराभव अजूनही चेल्सी खेळाडूंना झोंबत आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे, त्या पराभवानंतर चेल्सीने केवळ एक पराभव पत्करताना स्पर्धेत थेट अव्वल स्थानी कब्जा केला. शिवाय संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक असलेल्या मॅटिकसाठी तो सामना मोठा टर्निंग पॉइंट ठरला. त्याचवेळी २८ वर्षीय मॅटिक सध्या आपल्या नव्या स्थानी खेळताना शानदार कामगिरी करुन संघासाठी महत्त्वपुर्ण ठरत आहे. तसेच, आर्सेनालला नमवून कटू आठवणी मिटवण्यासाठी सध्या मॅटिकने कंबर कसली आहे...या सत्रात आर्सेनलकडून तुम्हाला ३ -० असा पराभव पत्करावा लागला. तो संघासाठी टर्निंग पॉईंट होता का, त्यानंतर नव्याने यंत्रणा लागू करण्यात आली. त्यामुळे तुमची कामगिरी सुधारली.हो, हे खरे आहे. तो आमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रसंग होता. मला आशा होती की तो प्रसंग आम्हाला जागे करणारा ठरेल. आणि तसेच झआले. त्यानंतर आम्ही सलग १३ सामने जिंकले. काही वेळा मोठे विजय मिळवण्यासाठी तुम्हाला पराभूत व्हावे लागते. मी खात्रीने सांगु शकतो की आम्ही पुन्हा अशा पद्धतीने पराभूत होऊ शकणार नाही. तुम्ही एखादा सामना गमवु शकता मात्र त्या पद्धतीने नाही.त्या दिवशी नेमक्या कोणत्या चुका झाल्या होत्या. आणि त्या एवढ्या महत्वाच्या होत्या.तुम्ही एखादी लढत गमावू शकता. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती तुम्ही कशा पद्धतीने त्यावर प्रतिक्रीया देता. आर्सेनल विरोधातील त्या सामन्यात आम्ही मैदानावर चांगल्या पद्धतीचा खेळ केला नाही. मी खात्रीने सांगु शकतो की शनिवारी नक्कीच एक वेगळी खेळी असेल. तुम्ही एका मोठ्या क्लबसाठी खेळताना अशा पद्धतीने पराभूत होता, तेव्हा ही गोष्ट स्विकारणे खूप कठीण असते. अमिरातीत झालेल्या पराभवाबद्दल तुझ्या आठवणी नेमक्या काय आहेत. हे खूप विचीत्र आहे. तुम्ही न लढता पराभूत झाला हे आमच्यासाठी खूप सोपे नाही. उदाहरणादाखल सांगु शकतो. आम्ही जानेवारीत टोटेनहॅमकडून पराभूत झालो. पण तुम्हाला जाणवेल की आमचा खेळ त्या दिवशी वेगळा होता. पण आर्सेनल विरोधातील सामन्यात ही बाब नव्हती. तो आमच्यासाठी वाईट दिवस होता. ते मात्र चांगले खेळले.यावेळी तुम्ही नक्कीच त्यांना पराभूत करण्यासाठी उत्सुक असाल. मागील पराभवाचा बदला घेण्यासाठी उत्सुकत असाल. ही तुमच्यासाठी संधी आहे. तुम्ही सर्वांना दाखवू शकता की तुम्ही का आला आहात, नाही का.नक्कीच, आम्ही पुढचा विचार करत आहोत. आमच्या खेळात योग्य त्या सुधारणा केल्या आहेत. आम्ही त्यांना दाखवु इच्छितो की, एक संघ म्हणून आम्ही कुठे आहोत आणि ते कुठे आहेत. आम्ही आमच्या घरच्या मैदानावर नक्कीच जिंकण्यासाठी प्रयत्न करू. त्यांच्याकडेही गुण आहे. ते संधी मिळवण्याच्या शोधातच असतील. पण मला खात्री आहे. आम्ही मानसिक आणि शारीरीक रुपाने तंदुरुस्त आहोत. मला खात्री आहे की, आमच्या संघाचे पाठिराखे खेळाचा नक्कीच आनंद घेतील.याच आठवड्यात आर्सेनलचा पराभव झाला. त्याने काय वाटले.नक्कीच, आर्सेनलच्या पराभवाने आम्हाला आनंद झाला. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मला अपेक्षा नव्हती की यावेळी ते गुण गमावतील. पण ही प्रिमीयर लीग आहे. यात सर्व शक्य आहे. तुम्हाला तुमच्या खेळावर एकाग्र व्हावे लागेल.(पीएमजी)
आर्सेनालविरुद्ध झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यास उत्सुक
By admin | Published: February 04, 2017 12:44 AM