नवी दिल्ली : माजी विश्वविजेत्या एल. सरितादेवीने पोलंडमध्ये सुरू असलेल्या १३ व्या सिलेसियान खुल्या बॉक्सिंग स्पर्धेत ६० किलो गटात कांस्य पदक जिंकले. ४८ किलो गटात स्टार खेळाडू एम. सी. मेरी कोम आणि मनीषा (५४ किलो) यांनी अंतिम फेरी गाठली. माजी युवा विश्व चॅम्पियन ज्योती गुलियादेखील ५१ किलो गटाच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे.शुक्रवारी उशिरा सरितासह लवलिना बोरगोहेन (६९ किलो)आणि पूजा राणी (८१ किलो) यांचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. सरिताला करिना इब्रागिमोवाकडून ०-५ ने पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय पथकाने लढतीवर आक्षेप नोंदविला. लवलिनाचा १-४ ने झालेला पराभवदेखील पक्षपाती असल्याची टीका भारतीय संघ प्रमुखांनी केली.पिंकी जांगडा अंतिम फेरीतदरम्यान, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची माजी कांस्यविजेती बॉक्सर पिंकी जांगडा हिने इस्तंबूल येथे सुरू असलेल्या अहमेट कोमार्ट बॉक्सिंग स्पर्धेची ५१ किलो गटात अंतिम फेरी गाठली. उपांत्य सामन्यात पिंकीने आॅस्ट्रेलियाची तायलाह रॉबर्टसन हिचा पराभव केला. त्याआधी उपांत्यपूर्व लढतीत विने माजी विश्वचॅम्पियन स्टेलुटा दुताचा ५-० ने पराभव केला होता. सोनिया लाठेर ५७ किलो, मोनिका ४८ किलो, मीनाकुमारी ५४ किलो, सिमरनजित कौर ६४ किलो आणि भाग्यवती काचरी ८१ किलो यांनीदेखील उपांत्य फेरीत धडक दिली.
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा : मेरी कोम अंतिम फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 11:18 PM