नवी दिल्ली : देशभरातील राष्टÑीय क्रीडा महासंघात महिलांना ३० टक्के प्रतिनिधित्व देत भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या आमसभेत उपस्थित होणाऱ्या महासंघांच्या तीन प्रतिनिधींमध्ये एका महिलेचा समावेश असावा, या आशयाचा प्रस्ताव आयओए तयार करीत आहे.आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक समितीने सर्वच राष्टÑीय आॅलिम्पिक संघटनांना लैंगिक समानता आणण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती देत आयओए महासचिव राजीव मेहता यांनी कार्यकारी परिषदेला अशा आशयाचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली. आॅलिम्पिक मोहिमेचा भाग म्हणून क्रीडा महासंघांच्या आमसभेत महिलांचे ३० टक्के प्रतिनिधित्व आवश्यक आहे. मेहता पुढे म्हणाले, ‘१५ जुलै २०१९ च्या माझ्या प्रस्तावानुसार आयओए कार्यकारिणीला नियम बनविण्याचा आग्रह केला. आयओएच्या आमसभेला उपस्थित होणारे राष्टÑीय क्रीडा महासंघांच्या तीन प्रतिनिधींमध्ये एक महिला असावी, असा हा प्रस्ताव आहे. (वृत्तसंस्था)अनेक महासंघांनी आपल्या कार्यकारिणीत महिलांना प्रतिनिधित्व दिले असल्याचे सांगून मेहता म्हणाले,‘भारतीय कनोर्इंग आणि कयाकिंग महासंघ, भारतीय हॅन्डबॉल महासंघ, हॉकी इंडिया, भारतीय तलवारबाजी संघ, भारतीय राष्ट्रीय रायफल संघ आणि भारतीय टेबल टेनिस महासंघ अशा अनेक महासंघांनी समानता रुजविण्याकडे वाटचाल करीत पुढाकार घेतला आहे, मात्र अद्याप बºयाच महासंघाने हे काम केलेले नाही.’