शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

आयओएचे तात्पुरते निलंबन

By admin | Published: December 31, 2016 2:03 AM

वादग्रस्त सुरेश कलमाडी व अभय सिंग चौटाला यांची आजीवन अध्यक्षपदी निवड करण्याच्या भारतीय आॅलिम्पिक महासंघाच्या निर्णयाविरुद्ध क्रीडा मंत्रालयाने

नवी दिल्ली : वादग्रस्त सुरेश कलमाडी व अभय सिंग चौटाला यांची आजीवन अध्यक्षपदी निवड करण्याच्या भारतीय आॅलिम्पिक महासंघाच्या निर्णयाविरुद्ध क्रीडा मंत्रालयाने कारवाई करताना आयओएचे तात्पुरते निलंबन केले आहे. निर्णय बदलेपर्यंत आयओएचे निलंबन कायम राहील, असे मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले. मंत्रालयाने म्हटले आहे की,‘सुरेश कलमाडी व अभय चौटाला यांची आजीवन अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय रद्द करेपर्यंत सरकारने भारतीय आॅलिम्पिक महासंघाची (आयओए) मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.’निलंबनाच्या कारवाईमुळे आयओएला राष्ट्रीय आॅलिम्पिक समिती (एनओसी) सरकारकडून मिळणाऱ्या विशेष अधिकारांचा वापर करता येणार नाही. त्याचप्रमाणे आयओएला मिळणारे सरकारी आर्थिक साहाय्य थांबविण्यात आले आहे.’कलमाडी व चौटाला यांची २७ डिसेंबरला चेन्नईमध्ये आयओएच्या वार्षिक आमसभेमध्ये आजीवन अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यामुळे भारतीय क्रीडा वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले तर क्रीडा मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली. मंत्रालयाने आयओएला कारणे दाखवा नोटीस बजावली आणि शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले. आयओएने नोटीसचे उत्तर देण्यास १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितली. क्रीडा मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, आयओएने कलमाडी व चौटाला यांची आजीवन अध्यक्षपदी नियुक्ती करीत सुशासन व अटींचे उल्लंघन केलेले आहे. त्यांच्याविरुद्ध कडक पाऊल उचलणे गरजेचे आहे. कारण हे राष्ट्रीय प्रतिष्ठा व जनभावनेसोबत जुळलेले प्रकरण आहे. सरकार आॅलिम्पिक चळवळीचा आदर करते आणि खेळातील स्वायत्तता जपण्यासाठी प्रतिबद्ध आहे. पण, सरकार आयओएतर्फे सुशासन व नैतिक सिद्धांताचे होत असलेल्या उल्लंघन केवळ मूक प्रेक्षक म्हणून बघू शकत नाही. ही देशाची प्रतिमा व प्रतिष्ठेची बाब आहे.’ आयओएमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर निलंबनची कारवाई करण्यात येत आहे, असे मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले. (वृत्तसंस्था)आयओए म्हणते.... अध्यक्ष देशाबाहेर असून त्यांच्यासोबत चर्चा करणे आवश्यक आहे.’मंत्रालयाचे म्हणणे असे... ‘सरकार आयओएच्या उत्तरामुळे समाधानी नाही. कारण सुरेश कलमाडी व अभय चौटाला यांच्याबाबत काही ठोस उत्तर दिलेले नाही. आयओएचे उत्तर म्हणजे केवळ वेळकाढूपणाचे धोरण असल्याचे निदर्शनास येते.’