शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

आयपीएल 10 - दिल्लीकरांची झुंज प्ले ऑफसाठी

By admin | Published: May 06, 2017 7:58 PM

दिल्लीच्या युवा खेळाडूंना या स्पर्धेत टिकून रहायचे असेल तर त्यांना आजच्या सामन्यात मुंबईला पराभूत करावेच लागेल, मात्र मुंबईला पराभूत करणे हे लायन्सची शिकार करण्याऐवढे सोपे नाही

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 -  दिल्लीच्या युवा खेळाडूंना या स्पर्धेत टिकून रहायचे असेल तर त्यांना आजच्या सामन्यात मुंबईला पराभूत करावेच लागेल, मात्र मुंबईला पराभूत करणे हे लायन्सची शिकार करण्याऐवढे सोपे नाही. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर सामना सुरु आहे. गुजरात लायन्सविरोधात दिल्लीचा ऋषभ पंतने केलेल्या खेळीमुळे क्रिकेट जगतातील सर्वच दिग्गज मोहित झाले आहेत. त्याची दखल न घेता रणनिती बनवणे मुंबईला शक्य होणार नाही. मात्र मुंबईवर विजय मिळवताना दिल्लीचा कस लागेल. गुजरात लायन्सपेक्षा मुंबईची गोलंदाजी चांगलीच धारधार आहे. 
मिशेल मॅक्लेघन, जसप्रीत बुमराह, लसीथ मलिंगा यांच्या भेदक गोलंदाजीने सर्वच संघातील फलंदाज हैराण झाले आहेत. हरभजनने देखील स्पर्धेत भेदक स्पेल टाकून प्रतिस्पर्ध्याची कोंडी केली आहे. त्यासोबतच अष्टपैलु हार्दिक पांड्या आणि कृणाल या भावडांनी आपल्या संघासाठी नेहमीच योगदान दिले आहेत. अखेरच्या षटकांत पांड्या बंधू तुफानी फटकेबाजी करतात. केरॉन पोलार्ड हा देखील मुंबई संघाची ताकद आहे. 
फलंदाजीच्या बाबतही मुंबई संघ दिल्लीपेक्षा बलाढ्य आहे. पार्थिव पटेल आणि जोश बटलर हे संघाला नेहमीच दणक्यात सुरुवात करुन देतात. बटलर फॉर्मात आला की तो प्रेक्षकांनाच क्षेत्ररक्षक बनवुन टाकु शकतो. रोहित शर्मा हा त्याच्या सहज सुंदर फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याने आरसीबी विरोधातील सामन्यात दमदार अर्धशतक झळकावले होते. त्याचा फॉर्म मुंबई संघाच्या फलंदाजी चिंताच मिटवून टाकतो. १ मे रोजी झालेल्या याच सामन्यात कृणालला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले होते. दिल्लीकर फॉर्ममध्ये असले तरी या स्पर्धेत मुंबईला फक्त पुणे संघच पराभूत करु शकला. इतर सर्व संघांवर मुंबईने एकहाती विजय मिळवला आहे. दिल्लीच्या फलंदाजीची भिस्त युवा संजू सॅमसन, करुण नायर, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत यांच्यावर अवलंबून आहे. जखमी जहीरच्या अनुपस्थितीत  कर्णधारपदाची धुरा करुण नायर याने तर गोलंदाजीची धुरा मोहम्मद शमी याने  समर्थपणे सांभाळली आहे. संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांना बाद केल्यानंतर मुंबईला सामन्यावर वर्चस्व गाजवण्याची संधी आहे. मात्र श्रेयस अय्यरने देखील मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करून दाखवली आहे. हंगामी कर्णधार करुण नायर याने नेतृत्व योग्य पद्धतीने केले असले तरी फलंदाजी त्याला दम दाखवता आला नाही. या स्पर्धेत तो फक्त एकदाच ३०चा आकडा पार करु शकलेला आहे.  शमीच्या सोबतीला
गोलंदाजीची धुरा कासिगो रबाडा, पॅट कमिन्स, अमित मिश्रा हे सांभाळतात. मात्र त्याचा फारसा फायदा संघाला होऊ शकलेला नाही. रैना आणि कार्तिकने केलेली धुलाई दिल्लीचे गोलंदाज विसरलेले नसतील. याच कामगिरीची पुनरावृत्ती मुंबईकर देखील करु शकतात.