शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

IPL 10 - गंभीरचे ‘तेवर’ विरुद्ध ‘कुल’ पुणेकर

By admin | Published: May 03, 2017 4:50 PM

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीर हा आपल्या फलंदाजीसोबतच आक्रमकतेसाठीही प्रसिद्ध आहे.

आॅनलाइन लोकमत कोलकाता, दि. 3 - कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीर हा आपल्या फलंदाजीसोबतच आक्रमकतेसाठीही प्रसिद्ध आहे. अनेकवेळा मैदानावर गरज असताना देखील तो बचावात्मक धोरण न स्वीकारता आणखीनच आक्रमक होतो. अशा गंभीरच्या संघाचा सामना आहे तो सुपर कुल पुणे संघासोबत. कॅप्टन स्मिथ, कॅप्टन कुल, शांत अजिंक्य रहाणे अशी सुपर खेळाडूंची फौजच रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडे आहे. आयपीएलच्या दहाव्या सत्रातला केकेआर विरुद्ध आरपीएस हा सामना थोड्याच वेळात कोलकात्यातील ईडन्स गार्डनवर सुरू होणार आहे.केकेआरचा ख्रिस लीन या सामन्याद्वारे पुनरागमन करू शकतो. त्यामुळे सुनील नरेनचा उपयोग पुन्हा फिरकीपटू म्हणून करता येऊ शकतो. त्याचसोबत संघाची खास बाब म्हणजे गंभीर आणि उथप्पाची जोडी. ही जोडी फोडणे पुणे संघाची आव्हानात्मक असेल. गंभीरने पार्ट टाइम ओपनरचा प्रयोग पुन्हा केल्यास पुणे संघासाठी डोकेदुखी ठरू शकते. ख्रिस लीन किंवा नरेन यांनी दमदार फटकेबाजी करत संघाला सुरुवात करून दिली. तर गंभीर आणि उथप्पा या पायावर मोठी खेळी करण्याची क्षमता बाळगून आहेत. आॅरेंज कॅपच्या यादीत दोघेही अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. केकेआरची गोलंदाजी कुल्टर नाईल, उमेश यादव, डी ग्रॅण्ड होम, व्होक्स यांच्यावर अवलंबून आहेत. त्यांच्या जोडीला नरेन आणि चायनामन कुलदीप यादव आहे. हैदराबाद विरोधातील सामन्याचा अपवाद वगळता केकेआरच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना चांगलेच त्रस्त केले आहे. आयपीएल १० च्या सत्रातील सर्वात भेदक स्पेल कुल्टर नाईलने आरसीबीविरोधात टाकला होता हे पुण्याचा चाणाक्ष कर्णधार स्मिथ नक्कीच विसरणार नाही. पुण्याचा संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघातील प्रत्येक स्टारने एका तरी सामन्यात मॅचविनिंग खेळी केली आहे. अजिंक्य रहाणे नेहमीच संघाला चांगली सुरुवात करून देण्यात यशस्वी ठरतो. स्मिथने मुंबई विरोधातील पहिल्या सामन्यात सुंदर फटकेबाजी केली होती. धोनीने मोक्याच्या वेळी संघासाठी धावा केल्या आहेत. तर बेन स्टोक्स याने संघ पराभवाच्या छायेत असताना शतकी खेळी करत संघाला सावरले. पुण्याची गोलंदाजी बहुतांशी इम्रान ताहीर, बेन स्टोक्स यांच्यावर अवलंबून आहे. वॉशिंग्टन सुंदर याला बळी घेता आले नसले तरी धावा रोखण्यात तो यशस्वी ठरतो. शार्दुल ठाकूूरला या स्पर्धेत फारशी छाप पाडता आलेली नाही. त्यांच्या मदतीला ख्रिस्टियनही आहे. कोलकात्याचा संघ त्यांच्या होम ग्राउंडवर फेव्हरेट मानला जात असला तरी त्यांच्यासमोर पुण्याचे कडवे आव्हान आहे.