शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
5
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
6
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
7
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
8
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
10
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
12
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
13
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
14
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
15
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
16
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
17
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
19
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
20
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ

IPL - 10 : अनुभवहीन दिल्लीसमोर गुजरातचे आव्हान

By admin | Published: May 04, 2017 7:12 PM

युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्ली संघासमोर रैनाच्या गुजरात लायन्सचे आव्हान आहे. दिल्ली संघाने गेल्या सामन्यात नवख्या कर्णधाराच्या नेतृत्वात मजबूत सनरायजर्सवर

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.04 - युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्ली संघासमोर रैनाच्या गुजरात लायन्सचे आव्हान आहे. दिल्ली संघाने गेल्या सामन्यात नवख्या कर्णधाराच्या नेतृत्वात मजबूत सनरायजर्सवर विजय मिळवला असला, तरी कमी अनुभव हीच दिल्लीची कमकुवत बाजू आहे. दोन्ही संघ गुणतक्त्यात तळाच्या स्थानावर आहे.
त्यामुळे आयपीएलच्या दहाव्या पर्वात आरसीबीनंतर बाहेर पडणारा संघ कोणता, हे ठरेल. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर थोड्याच वेळात गुजरात लायन्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स हा सामना सुरू होत आहे.  संजू सॅमसन, करुण नायर, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, जयंत यादव, शाहबाज नदीम हे युवा खेळाडू दिल्ली संघाचे आधारस्तंभ आहेत. मागच्या सामन्यात या खेळाडूंनी आपल्या खेळाचा दम हैदराबादला दाखवला होता. मात्र अनुभवी खेळाडू म्हणून कोरी अँडरसन, ख्रिस मॉरीस आणि अमित मिश्रा हे संघाचे सर्वात अनुभवी खेळाडू आहे. कर्णधार म्हणून नायरचा तिसराच सामना आहे. कसोटीतील त्रिशतकी खेळीनंतर सनरायजर्स विरोधात त्याची बॅट तळपली.  रिषभ पंत, श्रेयस अय्यर हे सातत्याने धावा काढतात. मात्र मोठी खेळी करण्यात दोन्ही फलंदाजांना अपयश आले आहे.
जहीरच्या अनुपस्थितीत संघात पुनरागमन केलेल्या मोहम्मद शमीने आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवून दिली. त्याने दोन महत्त्वपूर्ण बळी घेतले. अँजेलो मॅथ्युज् आणि कासिगो रबाडा यांनाही या सामन्यात विजयासाठी आपल्या अनुभवाचा फायदा संघाला  करून द्यावा लागेल. गुजरातचा संघ गुणतक्त्यात सातव्या स्थानावर आहे. तर दिल्लीचा संघ सहाव्या स्थानावर आहे. दोन्ही संघाचे आठ गुण असले. तरी गुजरातचे साखळी स्पर्धेत १० सामने  तर दिल्लीचे ९ सामने झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांना गुणतक्त्यात चौथ्यास्थानावर पोहचण्यासाठी पुढचे सर्व सामने जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळे आरसीबीपाठोपाठ स्पर्धेबाहेर पडणारा दुसरा संघ कोणता हे ठरेल.