शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
3
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
4
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
5
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
6
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
7
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
8
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
9
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
10
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
11
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
12
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
13
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
14
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
15
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
16
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
17
कुटुंबाचे कसे होणार? ही चिंता मिटविण्यासाठी...
18
लग्नाच्या आमिषाने बलात्कार आरोप अग्राह्य; विवाहितेच्या तक्रारीवर उच्च न्यायालयाचे निरीक्षण
19
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८५०० कोटी; एमएमआरडीएकडून निधी मंजूर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

IPL 10 - कोलकाता सात गडी राखून विजयी, गतविजेते स्पर्धेतून बाहेर

By admin | Published: May 18, 2017 1:33 AM

पावसाच्या व्यत्ययानंतर सुरु झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सात गडी राखून विजय मिळवला.

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 18 -  पावसाच्या व्यत्ययानंतर सुरु झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सात गडी राखून विजय मिळवला. दोनदा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स आणि  गतविजेता सनरायजर्स हैदराबाद यांच्यात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर लढत झाली. या लढतीत सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजीनंतर पावसाने अडथळा निर्माण केला. त्यानंतर रात्री उशिरा 12 वाजून 55 मिनिटांनी सामन्याला सुरुवात झाली. यावेळी कोलकाता नाईट रायडर्ससमोर 6 षटकांत 48 धावांचे आव्हान देण्यात आले. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 4.5 षटकात तीन बाद 48 धावा पूर्ण केल्या. त्यामुळे गतविजेता संघ सनरायजर्स हैदराबाद स्पर्धेतून बाहेर पडला. 
कोलकाता नाईट रायडर्सकडून मैदानात उतरलेल्या फलंदाजांची सुरुवात खराब झाली. मात्र, संघाचा कर्णधार गौतम गंभीरने चांगली फटकेबाजी करत संघाला दुस-या क्वालीफायरमध्ये स्थान मिळवून दिले. गौतम गंभीरने 19 चेंडूत नाबाद दोन षटकार आणि दोन चौकार लगावत 32 धावांची खेळी केली. तर, ख्रिस लिन सहा धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर लगेचच खाते न उघडताच युसूफ पठाण धावचीत झाला. या दोघांनाही गोलंदाज भुवनेश्वर कुमारने बाद केले. इशांक जग्गीने पाच धावा केल्या.    
दरम्यान, पावसाच्याआधी प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या हैदराबाद संघाने 20 षटकांमध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 128 धावा केल्या होत्या व कोलकात्याला विजयासाठी 129 धावांचे माफक लक्ष्य दिले होते. कोलकात्याच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून हैदराबादच्या फलंदाजांना मोठे फटके खेळू दिले नाही. कोलकात्याकडून कुल्टर-नाइलने सर्वाधिक 3 गडी तर उमेश यादवने 2 गडी बाद केले. त्यांना बोल्ट आणि चावला यांनी प्रत्येकी 1 विकेट घेऊन चांगली साथ दिली.  
हैदराबादची सुरूवात अडखळती राहिली. संघाच्या 25 धावा झाल्या असताना कोलकाताच्या उमेश यादवने शिखर धवनला 11 धावांवर बाद करून पहिला धक्का दिला. त्यानंतर मैदानात आलेल्या केन विल्यम्सन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण संघाच्या 75 धावा झाल्या असताना नॅथन कुल्टर-नाइलने विल्यम्सनला 24 धावांवर बाद केलं. तर 75 धावसंख्येवरच पियुष चावलाने वॉर्नरला 37 धावांवर त्रिफळाचीत केले. संघाच्या 99 धावा झाल्या असताना उमेश यादवने आणखी एक धक्का देताना युवराज सिंगला 9 धावांवर चावलाकरवी झेलबाद केले. त्यानंतर संघाच्या 118 धावा झाल्या असताना विजय शंकरला 22 धावांवर कुल्टर-नाइलने बाद केले तर लगेचच कुल्टर-नाइलने जॉर्डनला खाते न खोलता तंबूत धाडले. तर नमन ओझा 16 धावांवर आणि बिपुल शर्मा 2 धावांवर नाबाद राहिला. 
या लढतीतील विजेत्या संघाला मुंबई-पुणे संघांदरम्यानच्या पहिल्या क्वालीफायरमधील पराभूत संघासोबत १९ मे रोजी लढत द्यावी लागेल. या लढतीनंतर अंतिम फेरी गाठणारा दुसरा संघ निश्चित होईल.
केकेआर संघाने यंदाच्या मोसमातील दुसऱ्या टप्पात सातपैकी चार सामने गमावले आहेत. शाहरुख खानच्या मालकीचा संघ सुरुवातीला मिळवलेल्या यशाची पुनरावृत्ती करण्यास प्रयत्नशील आहे. मॅच विनर ख्रिस लिनला सूर गवसेल, अशी केकेआर संघाला आशा आहे.
लिनने गेल्या महिन्यात चिन्नास्वामी स्टेडियममध्ये २१ चेंडूंना सामोरे जाताना ५० धावांची खेळी केली होती. त्याने कर्णधार गंभीरच्या साथीने गुजरात लायन्सविरुद्ध सलामी लढतीत १८४ धावांची भागीदारी करताना नाबाद ९३ धावा केल्या होत्या. केकेआर संघाला सुनील नरेनकडूनही चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असेल. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध संघाला शानदार सुरुवात करून दिली होती. त्या लढतीत त्याने १५ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकताना आयपीएलमधील सर्वांत वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाची बरोबरी साधली होती.
केकेआर संघात मनीष पांडे व रॉबिन उथप्पा या फलंदाजांचाही समावेश आहे. त्यांनी अनुक्रमे ३९६ व ३८६ धावा फटकावल्या आहेत.
गंभीर सुरुवातीला शानदार फॉर्मात होता, पण त्यानंतर त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. त्याने आतापर्यंत यंदाच्या मोसमात ४५४ धावा फटकावल्या आहे. त्याला पुन्हा सूर गवसेल अशी केकेआर व्यवस्थापनाला आशा आहे.
गोलंदाजीमध्ये ख्रिस व्होक्स (१७ बळी) आणि उमेश यादव (१४ बळी) चांगली कामगिरी करीत आहेत. त्यांच्यापुढे डेव्हिड वॉर्नर अँड कंपनीला रोखण्याचे कडवे आव्हान राहणार आहे.
गत चॅम्पियन सनरायजर्स संघाने १४ पैकी ८ सामन्यांत विजय मिळवला आहे तर पाच सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.