ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 23 - सध्या आयपीएलचे दहावे सत्र सुरु आहे. पहिल्या सत्रापासूनच आयपीएल अनेक कारणामुळे चर्चेत राहिले आहे. भारतीय खेळाडूंसह परदेशी खेळाडूंनाही आयपीएलने भरभरून दिले. अश्विन, जाडेजा, बुमराह आणि भुवनेश्वर सारखे दर्जेदार खेळाडू आयपीएलने भारतीय संघाला दिले आहेत. आयपीएलमधील राजस्थान रॉयल संघाचे नेतृत्व करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नने आयपीएलच्या सर्वकालीन संघाची निवड केली आहे. शेन वॉर्नने काल आपल्या फेसबुक पोस्टवर ह्या संघाची घोषणा केली आहे. आयपीएलच्या नियमाप्रमाणे चार परदेशी आणि सात भारतीय खेळाडूंची निवड करावी लागते. त्याप्रमाणे वॉर्नने आपला आयपीएलचा संघ निवडला आहे. शेन वॉर्नने आपल्या संघाचे नेतृत्व भारताचा माजी कर्णधार एम.एस धोनीकडे सोपवले आहे. तर सलामीसाठी वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेल आणि न्युझीलंडच्या ब्रँडन मॅक्युलमची निवड केली आहे. शेन वॉर्नने निवडलेल्या संघात एकही ऑस्ट्रेलियन खेळाडूचा समावेश नाही हे विशेष आहे. वॉर्नची सर्वकालीन आयपीएल टीममहेंद्र सिंह धोनी (कप्तान), विराट कोहली, ख्रिस गेल, ब्रँडन मॅक्युलम, रोहित शर्मा, जॅक कॅलीस, रवींद्र जडेजा, युवराज सिंग, हरभजन सिंग, लसिथ मलिंगा आणि उमेश यादव.
IPL 10 - शेन वॉर्नच्या संघाचा धोनी कर्णधार
By admin | Published: April 23, 2017 1:41 PM