शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

आयपीएल ९ मध्ये धोनी वगळता अन्य कर्णधारांनी सोडली छाप

By admin | Published: May 10, 2016 6:41 PM

आयपीएलच्या नवव्या पर्वात जगातील सर्वांत यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनीवर त्याचे नशीब रुसले असल्याचे दिसून येते

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 10- आयपीएलच्या नवव्या पर्वात जगातील सर्वांत यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनीवर त्याचे नशीब रुसले असल्याचे दिसून येते. या स्पर्धेत त्याला फलंदाजीमध्ये कमाल दाखविता आली नाही तर कर्णधार म्हणून त्याची रणनीतीही सपशेल अपयशी ठरली. धोनीचा अपवाद वगळता अन्य संघांचे कर्णधार पुढे सरसावत जबाबदारी स्वीकारीत असून त्यांची वैयक्तिक कामगिरीही उल्लेखनीय ठरली आहे.विश्व टी-२० व वन-डे विश्वकप विजेता भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्सचे नेतृत्व करताना कर्णधार व खेळाडू म्हणून चकमदार कामगिरी केली आहे. तो आयपीएलमध्ये सर्वांत यशस्वी कर्णधार आहे, पण राइजिंग पुणे सुपरजायन्ट्स संघाचे नेतृत्व करताना अद्याप त्याला अनुकूल निकाल देता आलेले नाहीत. धोनीने सीएसकेतर्फे १२९ सामन्यांत नेतृत्व केले. त्यात संघाने ७८ सामने जिंकले तर ५० लढतींत संघाला पराभव स्वीकारावा लागला. या कालावधीत सीएसके संघाने दोनदा जेतेपदाचा मान मिळवला. दुसऱ्या बाजूचा विचार करता सुपरजायन्ट््सतर्फे धोनीने १० सामन्यांत नेतृत्व केले. त्यात धोनीच्या नेतृत्वाखाली संघाला केवळ तीन सामन्यांत विजय मिळवता आला तर सात सामन्यांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. धोनीला फलंदाजीमध्येही छाप सोडता आली नाही. सर्वश्रेष्ठ फिनिशरच्या भूमिकेला त्याला न्याय देता आला नाही. धोनीने सुपरजायन्ट््सतर्फे १० सामन्यांत ९ डावांमध्ये केवळ १८२ धावा फटकावल्या. त्यात त्याची सर्वोत्मत खेळी आहे ४१ धावांची. षटकार ठोकण्यात वाक् बगार असलेल्या धोनीच्या नावावर केवळ सात षटकारांची नोंद आहे. आयपीएलच्या नवव्या पर्वात अन्य कर्णधारांची वैयक्तिक कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. सध्या सर्वाधित धावा फटकावणाऱ्या पाच फलंदाजांमध्ये चार कर्णधारांचा समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि सनरायजर्स हैदराबादचा डेव्हिड वॉर्नर यांच्यादरम्यान ‘आॅरेंज कॅप’साठी चुरस आहे. कोहलीने आतापर्यंत ९ सामन्यांत ५६१ धावा फटकावल्या असून आॅरेंज कॅपच्या शर्यतीत तो वॉर्नरपेक्षा बराच आघाडीवर आहे. कोहलीने दोन शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहे. त्याची सरासरी ८०.१४ असून स्ट्राईक रेट १४२.०२ आहे. एकवेळ वॉर्नर व कोहली बरोबरीत होते. सनरायझर्सचा कर्णधार वॉर्नरने ९ सामन्यांत पाच अर्धशतके झळकावताना ४५८ धावा फटकावल्या आहेत. सनरायझर्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचे बरेच श्रेय वॉर्नरच्या कामगिरीला जाते. या दोघांव्यतिरिक्त कोलकाता नाईट रायडर्सला दोनदा जेतेपद पटकावून देणाऱ्या गौतम गंभीरने चांगला कर्णधार व दर्जेदार फलंदाज असल्याचे सिद्ध केले आहे. गंभीरने १० सामन्यांत ४९.७५ च्या सरासरीने ३९८ धावा फटकावल्या असून त्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. केकेआरने आतापर्यंत सहा सामन्यांत विजय मिळवला असून गुणतालिकेत हा संघ तिसऱ्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्सने १० सामन्यांत पाच विजय मिळवले असले तरी कर्णधार रोहित शर्माने आघाडीच्या फळीत काही चांगल्या खेळी केल्या आहेत. रोहितने आतापर्यंत १० सामन्यांत ३८८ धावा फटकावल्या असून त्यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे. गुजरात लायन्सचे नेतृत्व करीत असलेल्या सुरेश रैनाकडे समतोल संघ आहे, पण त्याची वैयक्तिक कामगिरीही चांगली आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने ११ सामन्यांत २८६ धावा फटकावल्या असल्या तरी त्याला केवळ एकदाच अर्धशतकाची वेस ओलांडता आली. (वृत्तसंस्था)