शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

आयपीएलच्या खेळाडूंच्या रात्रीच्या पार्ट्यांवर प्रकाशझोत

By admin | Published: May 22, 2015 5:34 PM

किंग्ज इलेव्हेन पंजाब संघाची मालक प्रिती झिंटा हिने यॉटवर आयोजीत केलेल्या एका पार्टीमध्ये एका महिलेने चेन्नई सुपरकिंग्जच्या एका खेळाडूसोबत रात्रभर होती

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - बीसीसीआयचे भ्रष्टाचार विरोधी पथकाचे प्रमुख रवी सावनी यांनी आयपीएलच्या टीम्समध्यल्या खेळाडुंनी व व्यवस्थापनांनी काय रंग उधळले आहेत यावर प्रकाश टाकणारे पत्र बीसीसीआयला लिहिल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. सावनी यांनी केलेल्या आरोपांनुसार काही खेळाडुंच्या खोल्यांमध्ये काही महिला रात्रभर राहिल्या होत्या, तसेच रात्र जागवणा-या पार्ट्यांचे आयोजन झाले होते, ज्यामध्ये अनेक बाहेरची मंडळी सहभागी झाली होती. या सगळ्यामुळे मॅच फिक्सिंग व स्पॉट फिक्सिंगचे आरोप झालेले आयपीएल भ्रष्टाचारमुक्त झाले आहे का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आयपीएलच्या सातव्या मालिकेत नियमांना पायदळी तुडवत संघ मालक व खेळाडू यांनी पार्ट्या केल्या, तसेच बीसीसीआय ला या बाबत कोणतीही सुचना देण्यात आली नव्हती. किंग्ज इलेव्हेन पंजाब संघाची मालक प्रिती झिंटा हिने यॉटवर आयोजीत केलेल्या एका पार्टीमध्ये एका महिलेने चेन्नई सुपरकिंग्जच्या एका खेळाडूसोबत रात्रभर होती. सावनी यांनी आपल्या पत्रामध्ये दिलेल्या माहितीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 
दिनांक ८ मे २०१४ रोजी हॉटेल ग्रँड मोर्या हॉटेलमध्ये एक महिला चेन्नई सुपर किंग्जच्या एका खेळाडूच्या खोलीत रात्री दहाच्या दरम्यान गेली व दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता ती बाहेर पडली. या प्रकरणी त्या खेळाडूला विचारले असता त्याने ती मुलगी आपली जवळची मैत्रीण असल्याचे स्पष्टिकरण दिले. 
दिनांक ९ मे २०१४ रोजी चेन्नई सुपर किंग्जच्याच दुसऱ्या एका खेळाडूने महिलेसोबत हाच प्रकार केला. त्या रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्या महिलेने खेळाडूच्या खोलीत प्रवेश केला व दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसातच्या सुमारास त्या खेळाडूच्या खोलीतून बाहेर पडली. या प्रकरणी खेळाडूने दिलेल्या स्पष्टीकरणात त्याने ती आपली मैत्रीण असून आपण लवकरच तिच्याशी लग्न करणार असल्याचे म्हटले आहे. बीसीसीआयने या महिलेविषयी अधिक माहिती मिळवली असता त्या महिलेबाबत वेगळीच माहिती मिळाली असल्याचे या पत्रात म्हटले आहे. आपीएलच्या सहाव्या मालिकेतील याच महिलेचा श्रीशांत व इतर काही खळाडूंसोबत संपर्क असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच हीच महिला रॉयल चॅलेंजर्सला चीअरअप करत असल्याचाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.  
९ मे २०१४ रोजी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने जे. डब्लू मेरिएट, दिल्ली येथे पार्टी आयोजीत केली होती. या पार्चीत संघाशी संबंधित नसलेले १०० हून अधिक लोक असल्याचे सांगितले जात आहे. तसेच दिल्ली संघाने पार्टीकरता बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती तसेच निमंत्रितांची यादीही देण्यात आली नाही. 
तसेच ८ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खान व त्याच्या एका उद्योगपती मित्राने संघातील खेळाडूंसाठी पार्टी आयोजीत केली होती. या पार्टीला शाहरूखचे नातलग उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ३० एप्रिल रोजी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून २ कि.मीच्या अंतरावर प्रिती झिंटाने आयोजित केलेल्या पार्टीत तिची मैत्रिणही उपस्थीत होती. हैद्राबाद सनराइजर्स संघाचे दोन खेळाडू त्यांच्या हॉटेलमधील खोलीवर सतत लोकांना भेटायचे. सामना कोणत्याही शहरात असला तरी त्यांना भेटी देणाऱ्यांच्या संख्येत कमतरता नसायची. त्याचप्रमाणे पंजाब संघाचा खेळाडू त्याच्या मित्रासोबत हॉटेलमध्ये रहायचा व सामन्यानंतर तो मित्राच्या घरी बसमधून जात असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. सावनी यांनी बीसीसीआयला पाठवलेल्या पत्राचा तपशील एक इंग्रजी वृत्तपत्राच्या हाती लागल्यावर ही बाब उघड झाली आहे.