ऑनलाइन लोकमत
तिरुवनंतपूरम, दि. २७ - भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याने इंडियन प्रिमियर लीगचे (आयपीएल) सामने देशाबाहेर जाऊ नयेत असे, आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
आयपीएल हा जागतिक ब्रँड आहे. तसेच, आयपीएलच्या माध्यमातून देशाला आर्थिक फायदा होतो. त्यामुळे आयपीएलच्या सामन्याचे आयोजित भारताबाहेर होऊ नये असे अनिल कुंबळे म्हणाला.
आयपीएलचे सामने २०१७ मध्ये परदेशात आयोजित करण्याचा विचार करीत असल्याचे संकेत बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिले होते.
याआधी दोनदा निवडणुकीमुळे आयपीएलचे आयोजन परदेशात करावे लागले होते. सर्वात आधी २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत आयपीएल झाली होती. त्यानंतर २०१४ मध्ये काही सामने संयुक्त अरब अमिरात येथे खेळवण्यात आले होते.