शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

IPL स्पॉट फिक्सिंग : चेन्नई, राजस्थानवर २ वर्षांची तर मयप्पन, राज कुंद्रावर आजीवन बंदी

By admin | Published: July 14, 2015 1:33 PM

आयपीएलच्या हाव्या सत्रातील भ्रष्टाचार व स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नई सुपर किंग्ज व राजस्थान रॉयल्स संघावर दोन वर्षांची तर गुरूनाथ मयप्पन व राज कुंद्रावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - इंडियन प्रिमीअर लीगच्या सहाव्या सत्रातील भ्रष्टाचार व स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नई सुपर किंग्ज व राजस्थान रॉयल्स संघावर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. यामुळे आता पुढच्या वर्षीची IPL सहा संघात होते, दोन नवीन संघ उतरवले जातात, या संघाच्या सगळे प्लेअर्स दुस-या संघात जातात की आणखी काही वेगळंच घडतं याकडे क्रीडारसिकांचे लक्ष लागले आहे. यादोन संघांबरोबरच बेटिंगमध्ये अडकलेल्या चेन्नई सुपरकिंग्जचा गुरूनाथ मयप्पन व राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा या दोघांवर कुठल्याही प्रकारे बीसीसीआयशी संबंधित क्रिकेटमध्ये सहभागी होण्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील  त्रिसदस्यीय समितीने मंगळवारी हा IPL वर शिस्तभंगाची कारवाई करणारा आत्तापर्यंतचा सगळ्यात कठोर निर्णय सुनावला. चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे मालक असलेलेच आयपीएलच्या सामन्यांत सट्टेबाजी करताना दोषी आढळले होते आणि यावर न्यायाधीश लोढा यांनी कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. तसेच, बीसीसीआयने क्रिकेटचे पावित्र्य अबाधित रहावे, समाजकंटकांपासून खेळ सुरक्षित रहावा यासाठी सगळ्या प्रकारच्या शिस्तीला महत्त्व द्यावे असे बीसीसीआयचे कानही न्यायाधीश लोढा यांनी टोचले आहेत.
सीएसकेचा अधिकारी असूनही मयप्पनने वारंवार बेटिंगमध्ये सहभाग घेतल्याचे सिद्ध झाले आहे आणि त्याच्या या कृतीमुळे खेळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मयप्पनने गैरव्यवहार केल्याचे सिद्ध झाले आहे व हा त्याचा पहिला गुन्हा आहे हा मुद्दा तर्कनिष्ठ नाही कारण त्याने अनेकवेळा बेटिंग केले आहे, असे लोढा यांनी स्पष्ट केले. तसेच  राज कुंद्रा हाही सातत्याने बुकींच्या संपर्कात होता परंतु मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी झाल्याचे सिद्ध झालेले नाही असे लोढा यांनी सांगितले. या दोघांच्या वर्तनावर कडक शब्दांत ताशेरे ओढताना त्यांच्यावर बीसीसीआयशी संबंधित कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटशी संबंधित प्रकारात सहभागी होण्यावर आयुष्यभरासाठी बंदी घालण्यात आली आहे.
लोढा यांच्या समितीने सुनावलेला निर्णय कढोर मानण्यात येत असला तरी आता पुढे काय असे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दोन वर्षांच्या बंदीमुळे, दोन नवीन संघ उतरवणार का, निर्दोष व मुक्त असलेल्या या संघांतील खेळाडूंचे काय होणार, दोन वर्ष बाहेर राहून तिस-या वर्षी हे दोन्ही संघ पुन्हा IPL खेळणार का, या सगळ्या प्रकारानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आणखी कठोर पावले उचलत बीसीसीआय या दाोन्ही संघांवर व त्यांच्या मालकांवर वेगळी कठोर कारवाई करणार का आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे व्यक्तिगतरीत्या शिक्षा जरी मिळाली नसली आणि तरीही संपूर्ण क्लीन चीट न मिळालेल्या बीसीसीआयमध्ये चांगलंच वजन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या श्रीनिवासन यांची भूमिका काय असेल हे सगळे प्रश्न निर्माण झाले असून क्रीडारसिकांचे याकडे लक्ष लागले आहे.
 
दोन वर्षांची बंदी लादण्यात आलेल्या चेन्नई व राजस्थानच्या संघावर बंदी लादण्यात आली खरी, पण आता त्या संघातील खेळाडूंचे काय होणार ? कोण आहेत ते खेळाडू ..
 
चेन्नई सुपरकिंग्ज:  महेंद्रसिंग धोनी, आशिष नेहरा, बाबा अपराजित, ब्रँडन मॅकलम, ड्वेन स्मिथ, ड्वेन ब्राव्हो, फान्सिस ड्यू प्लेसिस, इश्वर पांडे, मॅट हेन्री,  मिथुन मनहस, मोहित शर्मा, पवन नेगी, आर. अश्विन, रविंद्र जाडेजा, सॅम्युअल बद्री, सुरेश रैना, रोनित मोरे, मायकेल हसी, राहुल शर्मा, केल अॅबॉट, अंकुश बैंस, इरफान पठाण, प्रत्युष सिंग, अँड्र्यू ट्ये, एकलव्य द्विवेदी
 
 
राजस्थान रॉयल्स :  स्टीव्ह स्मिथ, शेन वॉटसन, स्टुअर्ट बिन्नी, जेम्स फॉकनर, अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन, रजत भाटिया, टिम सौदी, धवल कुलकर्णी, अभिषेक नायर, केन रिचर्डसन, बेन कटिंग, करूण नायर, दीपक हुडा, दिशांत याज्ञिक, विक्रमजित मलीक, अंकित शर्मा, राहुल तेवटिया, प्रवीण तांबे, ख्रिस मॉरीस, दिनेश साळुंके, जुऑन थेरॉन, प्रदीप साहू, बरींदर सरन, सागर त्रिवेदी