शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

IPL10 - मोहम्मद सिराज: 500 रुपये ते 2.3 कोटी!

By admin | Published: February 20, 2017 9:21 PM

तो पहिला सामना खेळला तेव्हा २० धावा देत नऊ गडी बाद केल्यामुळे मामाने त्याला ५०० रुपये बक्षीस दिले.

ऑनलाइन लोकमत

बंगळुरु, दि. 20 - तो पहिला सामना खेळला तेव्हा २० धावा देत नऊ गडी बाद केल्यामुळे मामाने त्याला ५०० रुपये बक्षीस दिले. क्रिकेटचा हा पहिला पुरस्कार होता. पण आज आयपीएलच्या दहाव्या पर्वात २.६ कोटी रुपयांचा भाव मिळताच हा खेळाडू स्तब्ध झाला. थोड्या वेळासाठी त्याला हे स्वप्न वाटले. स्वत:ला सावरल्यानंतर मेहनतीचे चीज झाल्याची जाणीव त्याला झाली. मोहम्मद सिराज या खेळाडूचे नाव!

वडील मोहम्मद गौस आणि आई शबाना बेगम यांच्यासाठी पॉश एरियात घर विकत घेण्याचे सिराजचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. सिराज वेगवान मारा करतो. या वेगवान गोलंदाजाला स्थानिक सनराइजर्स हैदराबादने २.६ कोटी खर्च करून लिलावात खरेदी केले. सिराजला भारत अ आणि शेष भारत संघाकडूनही खेळण्याची संधी मिळाली आहे.

आनंदात न्हावून निघालेला सिराज म्हणाला,'क्रिकेटमधील पहिली कमाई मी क्लब सामन्यात केली. माझे मामा संघाचे कर्णधार होते. २५ षटकांच्या त्या सामन्यात मी २० षटकांत प्रतिस्पर्धी संघाचे नऊ फलंदाज बाद केले. मामाने मला ५०० रुपये बक्षीस देताच अतिशय आनंद झाला होता. आज लिलावात मिळालेला भाव पाहून माझे डोळे विस्फारले. माझ्या वालिद साहेबांनी(वडील)फार संघर्षकेला आहे. ते आॅटोचालक आहेत पण कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा परिणाम त्यांनी माझ्यावर आणि माझ्या भावावर होऊ दिला नाही. गोलंदाजीसाठी स्पाईक विकत घ्यायचे तरी मोठी किंमत मोजावी लागते. वडील मात्र माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट स्पाईक आणायचे. आम्ही हालाखीच्या स्थितीत साधारण वस्तीत राहून मोठे झालो. मी कुटुंबासाठी उच्चभ्रू वस्तीत घर खरेदी करू इच्छितो. स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ आला आहे''.