ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18- टीम इंडियाचा फास्ट बॉलर इरफान पठाण आपल्या पत्नीसोबतच्या सेल्फीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. खरंतर पत्नी सोबतचा तो फोटो इऱफानला डोके दुखीही ठरतो आहे. इरफान पठाणला आपल्या पत्नीसोबतचा फोटो फेसबुकवर शेअर केल्यामुळे ट्रोल करण्यात आलं आहे. फेसबुकवर टाकलेल्या फोटोत इरफानची पत्नी सफाने आपला अर्धा चेहरा हाताने झाकला आहे. नखांना लावलेलं नेलपॉलिश, अर्धवट झाकलेले हात यामुळे इरफानला त्याच्या चाहत्यांनी ट्रोल केलं आहे. तू पठाण आहेस, आणि एका पठाणाने आपल्या पत्नीसोबतचे असे फोटो टाकणं गैर असल्याचं इरफानच्या चाहत्यांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं आहे. "दिस गर्ल इस ट्रबल" (ही मुलगी संकट आहे) असं कॅप्शनही त्याने या फोटोला दिलं आहे. त्यामुळे या फोटोवरून उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. हाच फोटो इरफारनने ट्विटरवरही शेअर केला आहे. कुछ तो लोग कहेंगे. लोगोका काम है कहना, असं कॅप्शन दिलं आहे.
Kuch to log kahenge logo ka kaam hai kehna but always #love#travelpic.twitter.com/aERzXr0g2j— Irfan Pathan (@IrfanPathan) July 17, 2017
इरफानचा पत्नीसोबतच्या फोटोवरील लोकांच्या कमेंटमध्ये या फोटोला त्यांची नापसंती दिसते आहे. अनेक चाहत्यांनी इरफानला, तू सच्चा मुसलमान नसल्याचंही म्हंटल आहे. तर फेसबुकवर काही लोकांनी "तू पठाण असून तू असं कृत्य कसं करु शकतोस, हे तुला शोभतं का? असा प्रश्न त्याला विचारला आहे. काही दिवसांपूर्वी इरफान पठाणणे आपली पत्नी सफा बेगसाठी एक रोमँटिक गाणं म्हणलं होतं. तेव्हा सोशल मीडियावर त्याच्या गाण्याला नेटीझन्सने चांगलीच पसंती दाखविली होती. पण आता आपल्या पत्नीसोबतचा फोटो फेसबुकवर टाकल्यामुळे इरफान सोशल मीडियावर ट्रोल होतो आहे. फेसबुकवरील या फोटोवर विविध कमेंट बघायला मिळत आहेत. एका युजरने म्हंटलं आहे, "तुझ्या बायकोला हात झाकायला सांग. एक मुसलमान आणि पठाण असल्याने हे तुझं कर्तव्य आहे.
आणखी वाचा
सौदीत मिनी स्कर्ट घालून फिरणाऱ्या मुलीला शिक्षा देण्याची मागणी
व्यक्तिगत स्वातंत्र्याचं उल्लंघन? आधार कार्ड प्रकरण 9 सदस्यीय घटनापीठाकडे
मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात इरफान आणि सफा यांनी लग्न केलं. इरफानची पत्नी सफा ही सौदी अरेबियातल्या जेहाद या शहरातली आहे. नुकताच सफाने मुलाला जन्म दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून इरफान पठाण आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर आहे. आयपीएलच्या गेल्या सिजनमध्ये इरफानने गुजरातच्या संघाच प्रतिनिधीत्न केलं होतं.
सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर इरफान पठाणणे अजून कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.
शामीवरही झाली होती टीका
काही दिवसांपुर्वी भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने फेसबूक आणि ट्टिवरवर आपली पत्नी आणि मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. ज्यावरुन शामीला धर्म आणि संस्कृतीच्या रक्षकांकडून टीकेचा सामना करावा लागला होता. शामीच्या पत्नीने घातलेल्या कपड्यांवरुन टीका करत पुढच्या वेळी हिजाब परिधान करुन फोटो काढण्याचा सल्ला देण्यात आला होता. काही लोक तर शामीला आपल्या पत्नीला ताब्यात ठेवायला जमत नसल्याचंही बोलले होते. तर काहींनी शामीच्या मुसलमान होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.