ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - दैव देतं पण कर्म नेतं... या म्हणीचा प्रत्यय नुकताच भारतीय स्टार गोलंदाज इशांत शर्माला आला आहे. सिलेक्टर्सनी केलेला फोन न उचलल्यामुळे इशांतला रणजी ट्रॉफीला मुकावे लागले आहे.
रणजी स्पर्धेच्या उपलब्धतेच्या विचारणेसाठी क्रिकेट निवड समितीच्या सदस्यांनी इशांतला फोन केला हगोता. मात्र इशांत सिलेक्टर्सचा फोन न उचलल्याने आणि त्यांना पुन्हा फोन न केल्याने त्याला या स्पर्धेतून डच्चू मिळाला आहे. 'आम्ही इशांतला ब-याच वेळा फोन केला, पण त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. ना आमच्या मेसेजेसना उत्तर पाठवलं, त्यामुळे आमचा नाईलाज झाला' अशी प्रतिक्रिया निवड समितीतील अधिकारी विनय लांबा यांनी दिली. ' त्याच्यावरील बंदीच्या काळात तो प्रथम दर्जाचे सामने खेळू शकेल का, याबाबत आम्हाला माहिती नाही. मात्र तो त्यास पात्र ठरल्यास आम्ही त्याला संघात घेऊ' असेही लांबा यांनी सांगितले.