सिडनी : भारताची प्रतिभावान नेमबाज मनू भाकर हिने शानदार कामगिरीत सातत्य राखून आयएसएसएफ ज्युनियर विश्वचषकात सुवर्णमय कामगिरी केली. गौरव राणा रौप्यचा मानकरी ठरला.मेक्सिकोत अलीकडे झालेल्या सिनियर विश्वचषकात दोन सुवर्ण पदके जिंकणाऱ्या १६ वर्षांच्या मनूने शनिवारी १० मीटर एअर रायफल प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदकाची कमाई केली.थायलंडची कन्याकोर्न हिरुनफोएम दुसºया स्थानावर राहिली. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात गौरव राणा याला रौप्य तसेच अनमोल जैन याला कांस्य मिळाले. मनूने २३५.९ गुणांसह अव्वल स्थान घेतले. चीनची केमान लू कांस्य पदकाची मानकरी ठरली.पुरुष गटात राणाने २३३.९ आणि अनमोलने २१५.१ गुण घेतले.भारताची देवांशी राणा ही देखील मनूच्या गटात अंतिम फेरीपर्यंत पोहोचली. पण चौथ्या स्थानावर राहिली.त्यानंतर मनू, राणा आणि महिमा अग्रवाल यांच्या संघाने सांघिक प्रकाराचे सुवर्णपदक जिंकले. पुरुष गटात अजुरन चिमा, अनहद जवांडा आणि अभिषेक आर्य हे क्रमश: सहाव्या, सातव्या आणि आठव्या स्थानी राहिले.या तिन्ही खेळाडूंनी सांघिक गटात देशाला सुवर्ण मिळवून दिले.हरियाणाच्या १६ वर्षीय मनू भाकरने आपली चमकदार कामगिरी कायम ठेवली. तर विवान कपूर याने ट्रॅप प्रकारांत काल कांस्यपदकाची कमाई केली होती.(वृत्तसंस्था)पदक तालिकेत भारत दुसºया स्थानावरभारताने आतापर्यंत पाच सुवर्णांसह ११ पदके जिंकली असून, दुसरे स्थान पटकविले. चीन १३ पदकांसह अव्वल स्थानावर कायम आहे. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. मनू भाकरच्या सुवर्ण आणि गौरव राणाच्या रौप्यपदकाने भारताने दुसरे स्थान गाठले.
आयएसएसएफ ज्युनियर विश्वचषक नेमबाजी : मनूला सुवर्ण, गौरवला रौप्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 5:26 AM