चँगवॉनः येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या खेळाडूंनी मंगळवारी पुरुषांच्या सांघिक स्कीट प्रकारात रौप्य, तर वैयक्तिक प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. भारताच्या खात्यात 7 सुवर्ण, 8 रौप्य आणि 7 कांस्य अशी एकूण 22 पदके जमा झाली आहेत.
सांघिक स्कीट प्रकारात गुरनिहाल सिंग गर्चा, आयुष रुद्रराजू आणि अनंत जीत सिंग यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने 355 गुणांसह रौप्यपदक नावावर केले. या गटात चेक प्रजासत्ताकने ( 356) अवघ्या एका गुणाच्या फरकाने सुवर्णपदक जिंकले, तर इटलीला 354 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.