नवी दिल्ली : येथे सुरू असलेल्या नेमबाजीच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या अपुर्वी चंडेलाने 10 मी एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले. अपुर्वीने 252.9 गुणांसहीत केला विश्वविक्रमाची नोंद केली. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना अपुर्वीने दोन फेऱ्या शिल्लक असताना 0.8 गुणांची आघाडी घेतली होती. चिनच्या झाओ रौझोने त्यानंतर 10.5 चा निशाणा साधला, परंतु अपुर्वीने त्याला 10.8च्या निशाण्याने प्रत्युत्तर देताना आघाडी 1.1 अशी वाढवली. अखेरच्या फेरीत अपुर्वीने 10.5 गुणांची कमाई करताना विश्वविक्रम नोंदवला. तिनो झाओच्या नावावर असलेला विक्रम मोडताना भारताच्या खात्यात सुवर्णपदक जमा केले.
चिनच्या रौशू झाओ आणि हाँग झू यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. अपूर्वी आणि अंजूम मुदगील या भारतीय खेळाडूंनी 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता आधीच निश्चित केली आहे. त्यामुळे चीनी खेळाडूंना ऑलिम्पिकचे तिकिट मिळाले.