शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

देशात क्रीडा संस्कृतीला चालना देणे आवश्यक, तरच भविष्यातील चॅम्पियन पुढे येतील - अभिनव बिंद्रा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:04 AM

योग्य तयारी, संयम आणि विजयाची भूक ही यशाची त्रिसूत्री आहे. या त्रिसूत्रीनुसार देशात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यात आली तरच भविष्यातील चॅम्पियन पुढे येतील, असे मत आॅलिम्पिक सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : योग्य तयारी, संयम आणि विजयाची भूक ही यशाची त्रिसूत्री आहे. या त्रिसूत्रीनुसार देशात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यात आली तरच भविष्यातील चॅम्पियन पुढे येतील, असे मत आॅलिम्पिक सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने व्यक्त केले आहे.बीजिंग आॅलिम्पिकमध्ये दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण विजेता अभिनव म्हणाला,‘क्रीडा संस्कृती, योग्य माहिती तसेच आधुनिक पायाभूत सुविधांअभावी चॅम्पियन घडू शकणार नाहीत. क्रीडा संस्कृतीची सुरुवात तर मातापित्यापासूनच व्हायला हवी. आईवडिलांनी आठवड्यातून किमान एक दिवस मुलांसोबत खेळावे. सिनेमा पाहणे, फिरायला जाण्यापेक्षा सामन्याला हजेरी लावल्याने खेळांचे महत्त्व मुलांच्या मनावर बालपणापासून रुजेल.’नीती आयोगाने आयोजित केलेल्या सोहळ्यात बिंद्राने स्वत:च्या आॅलिम्पिक प्रवासाचे पुनरावलोकन केले. तो म्हणाला,‘क्रीडा संस्कृतीसोबतच कोचिंग, सराव, उपकरणे आणि आहाराची माहिती हवीच शिवाय आधुनिक पायाभूत सुविधादेखील हव्यात. मी देशात सराव करण्याच्या बाजूने होतो पण योग्य सुविधा नसल्याने देशाबाहेर जावे लागायचे. खेळाडू लालफितशाहीत अडकणार नाहीत, याचीही खबरदारी घ्यावी लागेल. महाशक्ती असलेल्या चीनने समजले तसे आॅलिम्पिक खेळाचे महत्त्व समजून घ्यावे लागेल.’२००० च्या सिडनी आॅलिम्पिकमध्ये कमी वयात पदार्पण केल्यानंतर अथेन्स आॅलिम्पिकमध्ये तो सातव्या स्थानी राहिला. २००८ ला बीजिंगमध्ये सुवर्ण जिंकले तर २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये पदकाने त्याला हुलकावणी दिली होती. तो म्हणाला,‘अथेन्स आॅलिम्पिकने मला सावध केले. अंधूक प्रकाशात नेम साधण्याचा प्रयत्न करीत अनुभवातून सज्ज झालो. रिओ आॅलिम्पिकपूर्वी मी जर्मनीत सरावादरम्यान शरीराचे विश्लेषण करणारे ‘टेक्नो बॉडी’ हे पोर्टेबल यंत्र पाहिले. मी हे यंत्र खरेदी केले तेव्हा शरीराची रचना समजण्यास मदत झाली.’निवृत्तीचा निर्णय घाईत घेतला का, असे विचारताच बिंद्राचे उत्तर होते... नाही! तो म्हणाला,‘मी पुढील आॅलिम्पिक खेळू शकलो असतो पण आता थांबायला हवे, असे मनात आले व ते स्वीकारले. खेळ सोडल्याचे दु:ख नाही. तब्बल २२ वर्षे नेमबाजी हेच माझे आयुष्य होते. आता खासगी आयुष्यात व्यस्त आहे. भारतीय नेमबाजांचे भविष्य उज्ज्वल आहे. नेमबाजांची आॅलिम्पिकपर्यंत वाटचाल सोपी व्हावी अशा गोष्टी कराव्या लागतील.’(वृत्तसंस्था)अपयशातून यशाचा मार्ग...२२ वर्षांच्या करियरमध्ये पाच आॅलिम्पिकचा अनुभव असलेला बिंद्रा यंदा रिओ आॅलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर घसरताच नेमबाजीतून निवृत्ती जाहीर केली. करियरमध्ये कितीही चढउतार आले तरी अपयशातून यशाचा मार्ग शोधण्यास आपले प्राधान्य राहिले, असे बिंद्राचे मत आहे.