शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

सचिनचे विक्रम मोडणे अशक्य

By admin | Published: February 05, 2015 1:24 AM

मायदेशात वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न २०११मध्ये पूर्ण करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या वेळी २०१५चा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहे़

मेलबोर्न : मायदेशात वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न २०११मध्ये पूर्ण करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या वेळी २०१५चा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहे़ या महान खेळाडूने वर्ल्डकपमध्ये नोंदविलेले विक्रम या वेळी तरी कुणीही मोडू शकणार नाही, हे निश्चित आहे़सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत ४५ सामने खेळले आहेत़ यामध्ये ५६़९५च्या सरासरीने २२७८ धावा केल्या आहेत़ त्यामध्ये ६ शतके आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे़ वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सचिननंतर श्रीलंकन क्रिकेटपटू कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने यांचा क्रमांक लागतो़ मात्र, या वर्ल्डकपमध्ये सचिनला मागे टाकणे त्यांना शक्य होणार नाही़ संगकाराने वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत ३० सामन्यांत ९९१ धावा केल्या आहेत,तर जयवर्धने याने ३३ सामन्यांत ९७८ धावा केल्या आहे़ जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने १५ सामन्यांत ७२५ धावा केल्या आहे़ सचिनच्या वर्ल्डकपमधील ६ शतकांच्या विक्रमाला डिव्हिलियर्स आव्हान देऊ शकतो़ वर्ल्डकपमध्ये सध्या डिव्हिलियर्सच्या नावे ३ शतके आहेत़ सचिनने २००३च्या वर्ल्डकपमध्ये ११ सामन्यांत सर्वाधिक ६७३ धावा केल्या होत्या़ हा विक्रम विद्यमान खेळाडूंना तोडायचा असेल, तर त्यांना शंभर टक्के योगदान द्यावे लागणार आहे़ (वृत्तसंस्था)सचिनची उणीव भासणार विद्यमान विश्वचॅम्पियन भारत आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान हे संघ आगामी वन-डे वर्ल्डकपमध्ये १५ फेब्रुवारी रोजी आमने सामने येणार आहेत़ या लढतीत टीम इंडियाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची उणीव भासणार आहे़ कारण, वर्ल्डकपमधील पहिल्यांदाच पारंपरिक प्रतिस्पर्धीविरुद्धच्या लढतीत हा महान फलंदाज नसेल़ तेंडुलकरने वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत पाकविरुद्ध झालेल्या ५ सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे़ विशेष म्हणजे या सामन्यांत तीन वेळा सचिन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला आहे़ त्यामुळे नक्कीच भारताला त्याची उणीव भासेल़