शहरं
Join us  
Trending Stories
1
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा
2
जवळ आले, तोंड दाबलं अन् नंतर...; मुंबईत CSMT रेल्वे स्थानकाजवळ महिलेवर बलात्कार
3
T20 WC 2024 : रोहित शर्मानं जे केलं तेच आम्हीही करू; हरमनप्रीत कौरनं सांगितलं टीम इंडियाचं ध्येय
4
'ये लडकियां ना-महरम...'! पाकिस्तानात व्यासपीठावरून का निघून गेला झाकीर नाईक? मागे धावताना दिसले अधिकारी
5
'सिकंदर' सलमान खानचं 'किक' फोटोशूट! भाईजानने हटके पद्धतीने केली 'Kick 2'ची घोषणा
6
संयुक्त राष्ट्रात भारतानं काढली पाकिस्तानची खरडपट्टी; जगाला दाखवला 'दहशतवादी' चेहरा
7
Mumbai: बापच 5 वर्षांपासून करत होता बलात्कार; अल्पवयीने मुलीने व्हिडीओ बनवून...
8
'बाप-लेकी'च्या भेटीवर हसीन जहाँची तिखट प्रतिक्रिया; शमीवर आरोप करत म्हणाली...
9
भाजपा नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीरच केले; व्हिडीओ पाहून शरद पवारही चकीत
10
Supriya Sule : "दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
11
राहु नक्षत्रात शनी गोचर: ६ राशींची प्रगती, बचतीत यश; व्यवसायात नफा, नवीन नोकरीची संधी!
12
Navratri 2024: देवीच्या आरतीतलं प्रत्येक कडवं जणू काही देवीशी प्रत्यक्ष संवादच; वाचा भावार्थ!
13
इंदापूरात भाजपाचे बॅनर्स हटवले; हर्षवर्धन पाटील 'तुतारी' चिन्हावर विधानसभा लढणार?
14
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
15
Navratri 2024: नवरात्रीत केवळ डिजेवर नाचून नाही तर 'अशी' करा शक्तीची उपासना!
16
"ट्रेनचा स्पीड कमी करुन..."; वंदे भारतवर दगडफेक करणाऱ्याने सांगितलं धक्कादायक कारण
17
Women's T20 World Cup, INDW vs NZW : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
18
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
19
"त्या सिनेमाचा हिरो रात्री १२ वाजता मला...", मल्लिका शेरावतचा खुलासा, नेटकऱ्यांनी लावला अंदाज
20
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत

महाराष्ट्राच्या जेह पंडोलेची दमदार आगेकूच

By admin | Published: July 20, 2016 9:24 PM

महाराष्ट्राच्या जेह पंडोले आणि अहान भन्साली यांनी आपआपल्या सामन्यात शानदार विजय मिळवत इंडियन क्लासिक ज्युनियर ओपन स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत १३ वर्षांखालील

इंडियन क्लासिक स्क्वॉश : अहान भन्साली, वीर छोत्रानी यांचीही चमक

मुंबई : महाराष्ट्राच्या जेह पंडोले आणि अहान भन्साली यांनी आपआपल्या सामन्यात शानदार विजय मिळवत इंडियन क्लासिक ज्युनियर ओपन स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत १३ वर्षांखालील मुलांच्या गटात तिसरी फेरी गाठली. तर १७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या वीर छोत्रानीने उत्तर प्रदेशच्या सौरभ कुमारवर ३-१ असा विजय मिळवत आगेकूच कायम राखली.भारतीय स्क्वॉश रॅकेट महासंघाच्या मान्यतेने देशी-विदेशी ज्युनियर स्क्वॉशपटूंचे थरारक सामने एनएससीआय येथे सुरु आहेत. तीन सेटमध्ये झालेल्या एकतर्फी सामन्यात जेहने एकहाती वर्चस्व राखत ११-०, ११-०, ११-३ असा विजय मिळवत आगेकूच केली. तर अन्य सामन्यात महाराष्ट्राच्या अहानने तामिळानाडूच्या अनुश करचा ११-१, ११-१, ११-१ असा धुव्वा उडवला.१७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या वीर छोत्रानीने आक्रमक खेळाच्या जोरावर उत्तर प्रदेशच्या सौरभ कुमारचा १२-१४, ११-७, ११-९, १२-१० असा पिछाडीवरुन धुव्वा उडवला. महाराष्ट्राचा अन्य खेळाडू मानव मंढीयन याने देखील पहिला सेट गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करताना दिल्लीच्या आयान बेरीचा १०-१२, ११-४, ११-६, ७-११, ११-८ असा पाडाव केला. अंश पंजाबीने सरळ तीन सेटमध्ये बाजी मारताना दिल्लीकर अरमान अगरवालचा ११-५, ११-६, ११-२ असा फडशा पाडला.१९ वर्षांखालील गटात देखील महाराष्ट्राच्या अमन कुभांनी आणि प्रदिप चौधरी यांनी आपआपल्या सामन्यात विजयांनी नोंद केली. अमनने महाराष्ट्राच्याच मिहीर प्रकाशचा ११-६, ११-५, ११-४ आणि प्रदिपने आंध्र प्रदेशच्या नसीम अलीचा ११-८, ११-२, ८-११, ११-४ असा पराभव केला. मुलींच्या १३ वर्षांखालील गटात मात्र महाराष्ट्राच्या खेळाडूंनी निराश केली. इश्ती मेहता हिला तामिळनाडूच्या तमन्ना डी. विरुद्ध ११-९, ६-११, ५-११, ८-११ असा पराभव पत्करावा लागला. तर तनया बाफना हिलाही तामिळनाडूच्याच अस्मिता अरुमुगमविरुद्ध ३-११, ४-११, ३-११ असे पराभूत व्हावे लागले. तसेच महाराष्ट्राच्या मन्नत शाहचे आव्हान गोव्याच्या तनिष्का सिंगविरुद्ध ६-११, ४-११, ३-११ असे संपुष्टात आले. (क्रीडा प्रतिनिधी)