ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22 - वार्षिक करारबद्ध क्रिकेटपटूंची यादी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केली असून 'अ' श्रेणीत कसोटीतील आघाडीचे फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय यांचा समावेश करण्यात आला आहे. तर नुकताच आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावणाऱ्या रविंद्र जाडेजाला बढती दिली आहे. मात्र गौतम गंभीरसह हरभजन आणि दिनेश कार्तिक या ज्येष्ठ खेळाडूंचा विचार झाला नाही. तर युवराज सिंगला ब श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. तसेच रोहित शर्माला अ मधून ब श्रेणीत टाकण्यात आले आहे. शार्दूल ठाकूर, ऋषभ पंत यजुवेंद्र चहल, करुण नायर आणि हार्दिक पांड्या यांना सी ग्रेडमध्ये स्थान देण्यात आले आहे.अ श्रेणीतील प्रत्येक खेळाडूला वर्षाला 2 करोड तर ब श्रेणीतील खेळाडूला 1 करोड रुपये मानधन देण्यात येणार आहे. एक ऑक्टोबर 2016 पासून कसोटी खेळणाऱ्या खेळाडूला 15 लाख, वनडे खेळणाऱ्या खेळाडूला 6 लाख आणि टी-20 तील खेळाडूला 3 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने जाहिर केले आहे.
'अ' श्रेणीतील खेळाडू (प्रत्येक वर्षाला 2 करोड)-विराट कोहली (कर्णधार), एम.एस. धोनी, आर. अश्विन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रविंद्र जाडेजा, मुरली विजय'ब' श्रेणीतील खेळाडू (प्रत्येक वर्षाला 1 करोड)-रोहित शर्मा, के.एल. राहूल, भूवनेश्वर कुमार, मोहमद्द शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, वृद्धमान साहा, बुमराह, युवराज सिंग'क' श्रेणीतील खेळाडू (प्रत्येक वर्षाला 50 लाख) - शिखर धवन, रायडू, अमित मिश्रा, मनिष पांडे, अक्षर पटेल, करुण नायर, हार्दिक पांड्या, आशिष नेहरा, यजुवेंद्र चहल, पार्थिव पटेल, जयंत यादव, मनदिप सिंग, धवल कुलकर्णी, शार्दूल ठाकूर, ऋषभ पंत