नागपूर : ईशांक जग्गीने कारकिर्दीतील झळकावलेल्या १५ व्या शतकाच्या जोरावर झारखंडने अडचणीच्या स्थितीतून सावरताना गुजरात रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीच्या लढतीत पहिल्यांदा आघाडी घेतली. झारखंडने मंगळवारी तिसऱ्या दिवसअखेर गुजरातची दुसऱ्या डावात ४ बाद १०० अशी अवस्था करीत वर्चस्व मिळवले. जग्गीने १८२ चेंडूंना सामोरे जाताना १५ चौकार व १ षटकाराच्या मदतीने १२९ धावांची खेळी केली. कालच्या ५ बाद २१४ धावसंख्येवरून पुढे खेळताना झारखंडने पहिल्या डावात ४०८ धावांची मजल मारली आणि १८ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. जग्गीने राहुल शुक्लासोबत (२७) सहाव्या विकेटसाठी ७० तर कौशल सिंगसोबत (५३) सातव्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी करीत संघाला आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गुजराततर्फे आर. पी. सिंगने ९० धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले तर हार्दिक पटेलने १०८ धावांत दोन फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखविला. पहिल्या डावात १८ धावांनी पिछाडीवर पडलेल्या गुजरातची दुसऱ्या डावात सुरुवात निराशाजनक झाली. दिवसअखेर त्यांची ४ बाद १०० अशी अवस्था झाली होती. आजचा खेळ थांबला त्यावेळी २ धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या मनप्रीत जुनेजाला हार्दिक (०) खाते न उघडता साथ देत होता. सलामीवीर समित गोहेल (४९) आणि भार्गव मेराई (४४) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. नदीम शाहबाजने तीन फलंदाजांना माघारी परतवले तर एक फलंदाज धावबाद झाला. गुजरात संघाने आतापर्यंत ८२ धावांची आघाडी घेतली असून त्यांच्या ६ विकेट शिल्लक आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)धा व फ ल कगुजरात पहिला डाव ३९०. झारखंड पहिला डाव :- प्रत्युक्ष सिंग झे. भट्ट गो. सिंग २७, सुमित कुमार झे. मेराई गो. सिंग ०२, विराट सिंग त्रि. गो. भट्ट ३४, एस.एस. तिवारी पायचित गो. पटेल ३९, ईशांक जग्गी झे. भट्ट गो. आर.पी.सिंग १२९, ईशान किशन झे. बुमराह गो. सिंग ६१, आर. शुक्ला पायचित गो. पटेल २७, कौशल सिंग झे. गोहेल गो. आर.पी. सिंग ५३, एस. नदीम झे. गोहेल गो. आर.पी. सिंग १६, विकास सिंग नाबाद ००, ए.आर. यादव त्रि. गो. सिंग ०६. अवांतर (१४). एकूण १०२ षटकांत सर्वबाद ४०८. बाद क्रम : १-८, २-५३, ३-८९, ४-१२१, ५-२१३, ६-२८३, ७-३८०, ८-३९३, ९-४०२, १०-४०८. गोलंदाजी : आर.पी. सिंग २१-३-९०-६, आर.बी. कलारिया १४-५-४३-०, जसप्रीत बुमराह २७-८-१०३-१, आर. एच. भट्ट ११-१-५७-१, एच. पी. पटेल २९-२-१०८-२.गुजरात दुसरा डाव :- एस.बी. गोहेल पायचित गो. नदीम ४९, पी.के. पांचाल धावबाद ०१, बी.एच. मेराई त्रि. गो. नदीम ४४, पार्थिव पटेल झे. विराट सिंग नदीम ०१, एम.सी. जुनेजा नाबाद ०२, एच.पी. पटेल नाबाद ००. अवांतर (३). एकूण ३७ षटकांत ४ बाद १००. बाद क्रम : १-१८, २-८७, ३-९३, ४-९८. गोलंदाजी : ए.आर. यादव ११-२-१८-०, आर. शुक्ला १०-२-२५-०, एस. नदीम ११-२-३६-३, विकास सिंग ५-०-१९-०.
जग्गीच्या शतकाने झारखंडला आघाडी
By admin | Published: January 04, 2017 3:25 AM