शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

जय बिस्टाचे दमदार शतक

By admin | Published: March 07, 2016 3:15 AM

युवा सलामीवीर जय बिस्टा याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक आणि आघाडीच्या फळीतील अन्य फलंदाजांच्या उपयुक्त योगदानाच्या बळावर रणजी चॅम्पियन मुंबईने शेष भारताविरुद्ध इराणी करंडक

मुंबई : युवा सलामीवीर जय बिस्टा याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक आणि आघाडीच्या फळीतील अन्य फलंदाजांच्या उपयुक्त योगदानाच्या बळावर रणजी चॅम्पियन मुंबईने शेष भारताविरुद्ध इराणी करंडक क्रिकेट सामन्यातील पहिला दिवस गाजवला. दिवसअखेर त्यांनी ३ बाद ३८६, अशी धावसंख्या रचत धावांचा डोंगर उभारण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांच्या मजबूत फलंदाजीसमोर शेष भारताचे गोलंदाज बळी मिळविण्यासाठी तरसत असल्याचे दिसून आले. मुंबईच्या फलंदाजांनी गोलंदाजांचा समाचार घेताना त्यांना वर्चस्व मिळवू दिले नाही. तसेच, पहिल्याच दिवशी मुंबईच्या फलंदाजांनी २४८ धावा या फक्त चौकार आणि षटकारांनी ठोकल्या.सी.के. नायडू अंडर २३ स्पर्धेच्या फायनलमध्ये द्विशतक ठोकून मुंबईच्या सिनिअर संघात पुनरागमन करणारा बिस्टाने ९० चेंडूंत १५ चौकार आणि एका षटकारासह १०४ धावा केल्या आणि पहिल्या गड्यासाठी अखिल हेरवाडकर (९०) याच्या साथीने १९३ धावांची भागीदारी करताना संघाला शानदार सुरुवात करून दिली. हेरवाडकरने १४८ चेंडूंचा सामना करताना १५ चौकार मारले. हे दोघे १६ धावांच्या अंतरात बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर (५५) आणि सूर्यकुमार यादव (नाबाद ८८) यांनी तिसऱ्या गड्यासाठी ६३ धावांची भागीदारी करताना मुंबईची स्थिती आणखी मजबूत केली. स्टुअर्ट बिन्नीने अय्यरला बाद करीत ही भागीदारी मोडली. श्रेयस अय्यरने ४९ चेंडूंत १० चौकार मारले. त्यानंतर सूर्यकुमार यादवला आदित्य तारेच्या रूपाने चांगला साथीदार मिळाला. तारे ३८ धावांवर खेळत आहे. या दोघांनी आतापर्यंत चौथ्या गड्यासाठी नाबाद ११४ धावांची भागीदारी केली आहे. सूर्यकुमार यादवने १२५ चेंडूंचा सामना करताना १५ चौकार व एक षटकार मारला, तर आदित्य तारे याने ८६ चेंडूंत ४ चौकार मारले. शेष भारताकडून बिन्नी, अंकित राजपूत आणि कृष्णा दास यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.