शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

जयसूर्याला श्रीलंकन बोर्ड देणार धक्का

By admin | Published: June 02, 2017 12:56 AM

सेक्स टेप लीक प्रकरणात श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याला पद सोडून किंमत चुकवावी लागू शकते. जयसुर्या श्रीलंकन

आॅनलाइन लोकमत कोलंबो : सेक्स टेप लीक प्रकरणात श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याला पद सोडून किंमत चुकवावी लागू शकते. जयसुर्या श्रीलंकन निवड समितीचा अध्यक्ष आहे. काहीवर्षांपूवीर्ची ही सेक्स टेप आता समोर आली असली तरी, यामुळे श्रीलंकन क्रिकेट आणि देशाची प्रतिमा मलिन झाल्याचे श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या पदाधिका-यांचे मत आहे.त्यामुळे जयसूर्याला श्रीलंकन निवड समितीवरुन हटवले जाण्याची शक्यता आहे. जयसूर्या सध्या श्रीलंकन निवड समितीचा प्रमुख असून त्याला मुदतवाढ देण्यास बोर्ड अजिबता इच्छुक नसल्याची माहिती आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा संपल्यानंतर जयसुर्या स्वत: आपल्या पदाचा राजीनामा देईल किंवा तसे त्याने नाही केले तर त्याला मुदतवाढ मिळणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. सेक्स टेपमध्ये जयसुयार्सोबत जी तरुणी दिसतेय ती त्याची पूर्वपत्नी आहे. जयसूर्याने आपल्यासोबतचा तो एमएमएस मुद्दाम व्हायरल केल्याचा आरोप त्याच्या तिसऱ्या पत्नीने केलाय. जयसुयार्ने जाणीवपूर्वक आपल्याला बदनाम करण्यासाठी ही टेप व्हायरल केला असल्याचे या महिलेने सांगितले. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पधेर्नंतर जयसूर्या मुख्य निवडकर्ता राहणार नाही असे एका श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या पदाधिका-याने नाव न छापण्याच्या अटीवर डेक्कन क्रॉनिकल वर्तमानपत्राला सांगितले. ४७ वर्षीय जयसूर्याने या वादावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जयसूर्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर या महिलेने एका प्रतिष्ठीत व्यापाऱ्याबरोबर लग्न केले. १९९६ साली जगाला कळली जयसूर्याची ओळख सेक्स टेप लीक झाल्यामुळे जयसुर्या आता वादात सापडला असला तरी, या खेळाडूने काहीवर्षांपूर्वी भल्या भल्या गोलंदाजांची झोप उडवली होती. जयसुयार्ने १९८९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले पण १९९६ वर्ल्डकप स्पर्धेपासून खऱ्या अथार्ने क्रिकेटला या खेळाडूची ओळख झाली. १९९६ च्या वर्ल्डकप स्पर्धेपासून जयसूर्या व रोमेश कालुवितर्णा या श्रीलंकन सलामीवीरांच्या जोडीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. पहिल्या  १५ षटकात मोठे फटके खेळून वेगाने धावा जमवण्यास  या दोघांनी  सुरुवात केली. जयसूर्याच्या फटकेबाजीच्या जोरावर श्रीलंकेने त्यावेळी वर्ल्डकपची अंतिमफेरी गाठून पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला. १९९६ वर्ल्डकपच्या आधी श्रीलंकेची लिंबू-टिंबू संघांमध्ये गणना केली जायची. जागतिक क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा दबदबा निर्माण करण्यात जयसुयार्ने महत्वाची भूमिका बजावली. १९९६ पासून पुढची तीनवर्ष जयसुयार्ची बॅटने भल्या भल्या गोलंदाजांना सळो कि पळो करुन सोडले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२ हजार धावा आणि ३०० विकेट घेणारा जयसुर्या एकमेव क्रिकेटपटू आहे. २०११ मध्ये इंग्लंड विरुध्द शेवटची वनडे खेळून या क्रिकेटपटूने क्रिकेटला अलविदा केले.