ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 25 :रिओ आॅलिम्पिकमधील मॅरेथॉनदरम्यान मला कुठल्याही प्रकारचे विशेष रिफ्रेशमेंट नको. त्याची काहीही गरज नसल्याचे ओपी जैशा हिने स्वत: म्हटले होते. तिचे खासगी कोच निकोलाय स्रेसारेव यांनीच ही कबुली दिल्याने जैशाने सुरू केलेला वाद नव्या वळणावर पोहोचला आहे. बेलारुसचे असलेले निकोलाय यांनी जैशाला विशेष रिफ्रेशमेंटची गरज राहीलका, अशी विचारणा केली होती. पण जैशाने त्यास नकार दिला. त्यानंतर रेसदरम्यान जैशाला विशेष रिफ्रेशमेंट लागणार नसल्याचे आपण भारतीय अॅथ्लेटिक्स संघटनेला कळविले होते, असे निकोलाय यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
राष्ट्रीय विक्रमाची मानकरी जैशा हिने आरोप केला होता की, कडक उन्हात आयोजित मॅरेथॉनदरम्यान भारतीय अॅथ्लेटिक्स संघटनेने पिण्याचे पाणी आणि एनर्जी ड्रिंक्सची व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे धावताना मला जीव गेल्याचा भास होत होता. एएफआयच्या अधिकाऱ्यांनी मात्र जैशाचा आरोप खोटा ठरविला.
बेंगळुरुच्या साई केंद्रात बोलताना निकोलाय म्हणाले,जैशाने याआधी मॅरेथॉनदरम्यान कधीही पाणी किंवा एनर्जी ड्रिंक्सचा वापर केला नाही. मॅरेथॉनच्या एक दिवसापूर्वी मुख्य कोचचे सहायक राधाकृष्ण नायर यांनी माझ्याकडे जैशासाठी ड्रिंक्स किंवा पाण्याची गरज आहे काय अशी विचारणा केली होती. मी जैशाला ही बाब सांगितली. तिने केवळ साधारण पाण्याची मागणीकेली. तेव्हा जैशा रेसदरम्यान साधारण पाणी घेणार असल्याचे मी एएफआयला कळविले होते. जैशाने आॅलिम्पिकच्या तयारी दरम्यानही कधी विशेष ड्रिंक्स घेतले नाही. ती साधारण पाण्याचा वापर करीत असे. २०१६ मध्ये जैशाने कधीही विशेष ड्रिंक्स घेतले नाही.
रिओमध्ये आयोजकांनी पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था केली होती का, असे विचारताच निकोलाय म्हणाले,ह्यअसे नव्हते. मी रेसमध्ये धावलो नाही. संपूर्ण ४२ किमी जैशासोबत नव्हतो. काही अंतरापर्यंतचे चित्र मी सांगू शकतो. माझी नजर जिथवर जात होती, तिथे पाण्याची व्यवस्था होती. या रेसमध्ये एकूण १५७ धावापटू धावले. ७० व्या स्थानावर आलेला धावपटू आणित्याच्या कोचकडे विचारणा केली तेव्हा त्याने पाण्याची व्यवस्था २५-३० किमीनंतर होती आणि ती पुरेशी नसल्याचे सांगितले होते. मी जैशासोबत बोललो तेव्हा तिने देखील हा प्रकार सांगितला. २५ किमीनंतर पाण्याचीव्यवस्था(स्पजिंग पार्इंट) हे मॅरेथॉनमधील आदर्श स्थान नव्हे इतकेच मी सांगू शकतो