नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन ( NBA)मधील दी उताह जॅझ या संघातील खेळाडू रूडी गोबर्टला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर NBAनं सर्व सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला. रूडी सध्या कोरोना विषाणूवर उपचार घेत आहे. उपचार घेताना त्यानं या रोगातील रुग्णांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची धावपळ जवळून पाहिली आणि त्यामुळेच त्यानं मोठा निर्णय घेतला. NBAच्या या स्टार खेळाडूनं कोरोना विषाणूच्या रुग्णांना बऱ्या करणाऱ्या संस्थेसाठी ५ लाख अमेरिकन डॉलर म्हणजेत जवळपास ३ कोटी ७० लाखांची मदत करण्याचा निर्णय घेतला.
कोरोनाग्रस्तांसाठी रोनाल्डोचा पुढाकार; हॉटेल्सची केली रुग्णालयं अन् देतोय मोफत उपचार!
रूडी ही मदत Vivint Smart Home Arena आणि कोरोना विषाणूशी संबंधित समाजसेवा करणाऱ्या संस्थांना करणार आहे. फ्रान्समधील ओक्लाहोमो शहरातील उताह येथील संस्थांना त्यामुळे फार मोठी मदत मिळणार आहे. २७ वर्षीय रूडी हा कोरोना संक्रमित झालेला पहिला NBA खेळाडू ठरला. तो म्हणाला,''कोरोना विषाणूंनी संक्रमित लोकांना बरं करण्यासाठी जगभरात अनेक लोकं झटत आहेत. त्यांची न थकता काम करणारी धावपळ पाहून मी थक्क झालो. विशेषतः माझ्या शहरात उताह येथे आणि फ्रान्समध्ये या रोगाला रोखण्यासाठी झटणाऱ्या लोकांची तळमळ मी पाहत आहे. मी माझ्यापरीनं या विषाणूला रोखण्यासाठी छोटीशी मदत करत आहे.''
रूडीकडून केलेली ५ लाख डॉलरच्या मदतीपैकी २ लाख डॉलर रक्कम ही Vivint Smart Home Arena येथे पार्टटाईम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, उताह आणि ओक्लाहोमा शहरातील कोरोना संक्रमित व्यक्तीच्या कुटूंबीयांसाठी प्रत्येकी १ लाख आणि उर्वरित १ लाख ही फ्रान्समधील आरोग्य मदत केंद्रासाठी असेल.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Corona Virus मुळे आता 'मिनी आयपीएल'चा प्रस्ताव; वर्ल्ड कपचा फॉरमॅट कॉपी करणार?
Coronavirus: रायगड, पनवेलमधील खेळाडू शारजाहून परतले; 14 दिवसांसाठी निरिक्षणाखाली
वटवाघूळ खाण्याची, त्यांचं रक्त व लघवी पिण्याची गरजच काय?; Corona Virusवरून पाक गोलंदाज भडकला
IPL 2020 : आयपीएल होणार की नाही? BCCIच्या बैठकीत सात पर्यायांवर झाली चर्चा
IPL 2020 : प्रेक्षकांविना क्रिकेट खेळण्यात मजा नाही; वीरेंद्र सेहवागची स्पष्ट भूमिका