शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

गुजरातविरुद्ध झारखंड अडचणीत; किशनने सावरले

By admin | Published: January 03, 2017 12:38 AM

प्रियांक पांचलच्या शतकी खेळीनंतर वेगवान गोलंदाज आर. पी. सिंगच्या अचूक माऱ्याच्या जोरावर गुजरातने झारखंडविरुद्ध रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीच्या लढतीत दुसऱ्या दिवशी वर्चस्व कायम राखले.

नागपूर : प्रियांक पांचलच्या शतकी खेळीनंतर वेगवान गोलंदाज आर. पी. सिंगच्या अचूक माऱ्याच्या जोरावर गुजरातने झारखंडविरुद्ध रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीच्या लढतीत दुसऱ्या दिवशी वर्चस्व कायम राखले. कालच्या ३ बाद २८३ धावसंख्येवरून पुढे खेळणाऱ्या गुजरात संघाने पहिल्या डावात ३९० धावांची मजल मारली.

वैयक्तिक १४४ धावसंख्येवरून पुढे खेळताना पांचल पाच धावांची भर घालत तंबूत परतला. त्याला अजय यादवने बाद केले. त्याने २६७ चेंडूंना सामोरे जाताना २१ चौकार लगावले. तळाच्या फळीतील आर. पी. सिंगने फलंदाजीमध्ये उल्लेखनीय योगदान देताना ६९ चेंडूंना सामोरे जात ५ चौकार व १ षट्काराच्या मदतीने ४० धावांची खेळी केली. यादव व शुक्ला यांनी अनुक्रमे ६७ व ७१ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी ३ बळी घेतले, तर विकास सिंगने ५९ धावांत २ फलंदाजांना माघारी परतवले. शाहबाज नदीम व कौशल सिंग यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

प्रत्युत्तरात खेळताना आर. पी. सिंगच्या (३-४८) अचूक माऱ्यापुढे झारखंड संघाची एकवेळ ४ बाद १२१ अशी अवस्था झाली होती. दिवसअखेर झारखंड संघाने ५ बाद २१४ धावांची मजल मारली. झारखंड संघ अद्याप १७६ धावांनी पिछाडीवर असून, त्यांच्या पाच विकेट शिल्लक आहेत.

आर. पी. सिंगने दोन्ही सलामीवीर प्रत्युष सिंग (२७) व सुमित कुमार (२) यांना माघारी परतवले. फॉर्मात असलेल्या ईशान किशनने (६१) ईशांक जग्गीच्या (नाबाद ४०) साथीने पाचव्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. आर. पी. सिंगने ईशानला माघारी परतवत ही भागीदारी संपुष्टात आणली. ईशानने ५९ चेंडूंना सामोरे जाताना ९ चौकार व ३ षट्कार लगावले. सोमवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी जग्गीला राहुल शुक्ला (०) खाते न उघडता साथ देत होता. धा व फ ल कगुजरात पहिला डाव : एस. बी. गोहेल झे. विराट सिंग गो. विकाश सिंग १८, पी. के. पांचल झे. कौशल सिंग गो. यादव १४९, बी. एच. मेराई झे. ईशान किशन गो. विकाश सिंग ३९, पार्थिव पटेल पायचित गो. कौशल सिंग ६२, एम. सी. जुनेजा झे. विराट सिंग गो. यादव २२, आर. एच. भट्ट पायचित गो. नदीम २३, सी. जे. गांधी झे. प्रत्युक्ष सिंग गो. यादव २०, आर. बी. कलारिया त्रि.गो. शुक्ला ०१, आर. पी. सिंग त्रि.गो. शुक्ला ४०, एच. पी. पटेल नाबाद ०४, जे. जे. बुमराह झे. ईशान किशन गो. शुक्ला ००. अवांतर (१२). एकूण १२६.२ षटकांत सर्वबाद ३९०. बाद क्रम : १-६२, २-१२७, ३-२६६, ४-२९४, ५-२९९, ६-३२३, ७-३२४, ८-३८६, ९-३८६, १०-३९०. गोलंदाजी : ए. आर. यादव २२-६-६७-३, विकाश सिंग १९-६-५९-२, आर. शुक्ला २६.२-७-७१-३, एस. नदीम ३५-३-१०६-१, कौशल सिंग २०-५-६१-१, एस. एस. तिवारी ३-०-१३-०, प्रत्युक्ष सिंग १-०-३-०. झारखंड पहिला डाव : प्रत्युक्ष सिंग झे. भट्ट गो. सिंग २७, सुमित कुमार झे. मेराई गो. सिंग ०२, विराट सिंग त्रि.गो. भट्ट ३४, एस. एस. तिवारी पायचित गो. पटेल ३९, ईशांक जग्गी खेळत आहे ४०, ईशान किशन झे. बुमराह गो. सिंग ६१, आर. शुक्ला खेळत आहे ००. अवांतर (११). एकूण ५१ षटकांत ५ बाद २१४. बाद क्रम : १-८, २-५३, ३-८९, ४-१२१, ५-२१३. गोलंदाजी : आर. पी. सिंग ९-२-४८-३, आर. बी. कलारिया ११-३-४१-०, जसप्रीत बुमराह १२-४-३८-०, आर. एच. भट्ट ६-१-३७-१, एच. पी. पटेल १३-१-४५-१.