गाबाला, अजरबेजानी : भारताचा जितू राय अणि हीना सिद्धू यांनी आयएसएसएफ विश्व चषकात दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत मिश्र गटात अंतिम फेरीत रशियाला ७ -६ ने पराभूत करत सुवर्णपदकाची कमाई केली, तर फ्रान्सने इराणवर विजय मिळवत कांस्यपदक पटकावले. या आधी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी जितू आणि हीना दोन्ही पुरुष आणि महिला गटात दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत अनुक्रमे १२वे अणि नववे स्थान मिळवले होते, त्यामुळे दोन्ही खेळाडू अंतिम फेरीत प्रवेश करू शकले नव्हते. आघाडीचे आठ खेळाडू या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी होतात. मिश्र गटात भारत पदक तालिकेत नाही. मात्र, टोकियो आॅलिम्पिक पदक स्पर्धेसाठी भारताला मंजुरी मिळाली आहे. (वृत्तसंस्था) भारताच्या या जोडीचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी दिल्लीत सुवर्णपदकाची कमाई केली होती. गाबालात चीनचा संघ सहा पदकांसह आघाडीवर आहे. त्यात चीनने तीन सुवर्णपदके पटकावली आहेत.
जितू - हीनाला विश्वकपमध्ये सुवर्ण
By admin | Published: June 13, 2017 4:44 AM