योहान ब्लॅक दुखापतीमुळे राष्ट्रकुलमध्ये खेळणार नाही
By admin | Published: July 12, 2014 10:06 PM
ग्लास्गो: माजी विश्व चॅम्पियन जमैकेचा योहान ब्लॅकला शुक्रवारी ग्लास्गोमध्ये डायमंड लीगमध्ये दुखापत वाढल्याने १०० मी़च्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले़ तत्पूर्वी ब्लॅकने दुखापतीमुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दर्शविला होता़ जमैकाच्या या धावपटूला गुडघ्याच्या मागील नसामध्ये होत असलेल्या दुखापतीमुळे ६० मी़ शर्यतीनंतर बाहेर ठेवावे लागले तर त्याच्याच देशाचा निकेल अश्मीएडेने ...
ग्लास्गो: माजी विश्व चॅम्पियन जमैकेचा योहान ब्लॅकला शुक्रवारी ग्लास्गोमध्ये डायमंड लीगमध्ये दुखापत वाढल्याने १०० मी़च्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले़ तत्पूर्वी ब्लॅकने दुखापतीमुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दर्शविला होता़ जमैकाच्या या धावपटूला गुडघ्याच्या मागील नसामध्ये होत असलेल्या दुखापतीमुळे ६० मी़ शर्यतीनंतर बाहेर ठेवावे लागले तर त्याच्याच देशाचा निकेल अश्मीएडेने अतिशय अटीतटीच्या लढतीमध्ये मायकल रॉजर्सला मागे टाकताना ९़९७ सेकंदामध्ये शर्यत जिंकली़ दोनदा ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणार्या ब्लॅकला सलग गुडघ्यामध्ये दुखापत झाल्याने शर्यतीतून बाहेर पडावे लागले़यापूर्वी ब्लॅकने म्हटले होते की, सन २०१६ ऑलिम्पिकसाठी कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता तो याच शहरामध्ये होणार्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेणार नाही़ (वृत्तसंस्था)